post mortem room esakal
नाशिक

SAKAL Impact News : बेबी वॉर्मर अन शवविच्छेदन कक्ष सुरु; लासलगाव रुग्णालयात ॲक्शन मोडवर

Nashik News : लासलगाव शहर विकास समिती व मुस्लिम फाउंडेशन यांनी लासलगाव रुग्णालयात सुविधा संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत डॉक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याकडे लक्ष वेधले होते.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : लासलगाव ग्रामीण रुग्णालय सलाईनवर ही रुग्णालयातील गैरसोयीची सकाळमध्ये २२ जुलैला बातमी प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने शवविच्छेदन कक्ष व बेबी वॉर्मर या दोन सुविधा तात्काळ सुरू केल्या. लासलगाव शहर विकास आघाडी व मुस्लिम फाउंडेशनने सकाळचे आभार मानले आहे. (SAKAL Impact Baby Warmer Autopsy Room Launched Lasalgaon hospital)

लासलगाव शहर विकास समिती व मुस्लिम फाउंडेशन यांनी लासलगाव रुग्णालयात सुविधा संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत डॉक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याकडे लक्ष वेधले होते. दरम्यान बातमी प्रसिध्द झाल्यानंतर येथे दोन डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असून आता रात्रीच्या वेळेस उपलब्ध राहणार असल्याने सांगण्यात आले आहे. लासलगाव ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले असून त्यासाठी १३ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.

लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने प्रकाश पाटील, राजेंद्र कराड ,संदीप उगले, सचिन होळकर, स्मिता कुलकर्णी, माया होळकर, अर्षद शेख, फिरोज मोमीन ,मिरान पठाण, संतोष पानगव्हाणे, शहजाद पठाण यांनी दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT