Cleaning of the traffic police post at CBS Chowk. esakal
नाशिक

SAKAL Impact : ...अन्‌ चौकीची झाली स्वच्छता!

SAKAL Impact : सीबीएस चौकातील वाहतूक पोलिस चौकीस कचराकुंडीचे स्वरूप आले होते. तसेच रात्रीच्या वेळी चौकी मद्यपीचे आश्रयस्थान ठरत.

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : सीबीएस चौकातील वाहतूक पोलिस चौकीस कचराकुंडीचे स्वरूप आले होते. तसेच रात्रीच्या वेळी चौकी मद्यपीचे आश्रयस्थान ठरत. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेत संबंधित यंत्रणेकडून या पोलिस चौकीची स्वच्छता करण्यात आली. उन्हाचा चटका आणि पावसापासून बचावासाठी सीबीएस सिग्नलवर नियुक्त असलेल्या वाहतूक पोलिसांसाठी चौकात चौकी बसवण्यात आली आहे. ( police station was cleaning at cbs )

परंतु, वापरा अभावी चौकीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याची संधी साधत चौकातून ये-जा करणारे नागरिक, भिकारी तसेच मद्यपी यांनी विविध प्रकारचा कचरा चौकीत टाकून चौकीस कचराकुंडी करून टाकले होते.रात्रीच्या अंधारात मद्यपी चौकीचा आधार घेत मद्य प्राशन करत बाटल्या तेथेच फेकून निघून जात. परिसरात नियुक्त वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत होते. (latest marathi news)

दिवसेंदिवस चौकीतील कचऱ्याचे प्रमाण वाढत होते. चौकीसह परिसरास बकाल स्वरूप आले होते. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत चौकीची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी कमी झाली आहे. परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

SCROLL FOR NEXT