Stone pavement spread at GPO Post Office entrance.  esakal
नाशिक

SAKAL Impact : मुख्य टपाल कार्यालयाची वाट काहीशी सुकर! अधिकारी, नागरिकांकडून समाधान; ‘सकाळ’ मानले आभार

Nashik News : जीपीओ कार्यालयाची वाट बिकट आशयाचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठांनी तत्काळ दखल घेत दगडी कच पसरवून मार्ग काहीसा सुकर करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : जीपीओ टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. कार्यालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. जीपीओ कार्यालयाची वाट बिकट आशयाचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठांनी तत्काळ दखल घेत दगडी कच पसरवून मार्ग काहीसा सुकर करण्याचा प्रयत्न केला. (SAKAL Impact Waiting for Head Post Office bit easier)

शहराचे मुख्य टपाल कार्यालय म्हणून ओळख असलेल्या जीपीओ टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले होते. शिवाय चिखलाचे साम्राज्य पसरले होते. कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना डबक्यातील पाणी आणि चिखल तुडवत कार्यालयात प्रवेश करावा लागत होता.

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. वरिष्ठांनी तत्काळ याची दखल घेत दगडी कच टाकून पसरविण्यात आली. त्यामुळे पाऊस पडल्यास पाण्याचे डबके साचणे आणि चिखल होण्यास प्रतिबंध लागणार आहे. कार्यालयाची वाट कच टाकल्याने काहीशी सुकर झाल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

असे असले तरी अन्य भागातीलही पसरलेल्या चिखलाची स्वच्छता व्हावी. कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार करण्यात यावा. जेणेकरून वारंवार असे प्रकार घडणार नाही. कायमस्वरूपी अडचण नाहीशी होण्यास मदत मिळेल. अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. (latest marathi news)

दुसऱ्या प्रवेशद्वारावर मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बीएसएनएल अर्थात भारतीय दूरसंचार निगम यांच्या कार्यालयाचे दुसरे प्रवेशद्वार आहे. यापूर्वीही बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी टपाल कार्यालयाकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

त्यांच्याकडून मात्र त्याकडे डोळे झाक केले जात असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा त्या प्रवेशद्वारावर वावर असतो. बीएसएनएल विभागाने ते प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. अन्यथा त्याची दुरुस्ती करून सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी. अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT