chhgan bhujbal esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! अस्वस्थ होऊ नका, मीही तुमच्यातलाच

SAKAL Special : नाशिक लोकसभेच्या जागेवरून मित्रपक्षात असूनही विद्यमान खासदार हेमंत गोडसे अन् भाजपचे दिनकर पाटील यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ आहे.

सकाळ वृत्तसेवा

अस्वस्थ होऊ नका, मीही तुमच्यातलाच

नाशिक लोकसभेच्या जागेवरून मित्रपक्षात असूनही विद्यमान खासदार हेमंत गोडसे अन् भाजपचे दिनकर पाटील यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ आहे. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने आता भुजबळही उमेदवारीच्या रेसमध्ये आल्याच्या चर्चांनी जोर धरला.

यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली. यावर स्वतः छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना, मी मुख्यमंत्र्यांना त्यांच्याकडील एका विभागाच्या कामानिमित्त भेटलो, तेही केवळ ५ मिनिटांसाठी.

राजकारणाची खलबलतं ही पाच मिनिटांत संपत नाहीत, ती तासन्तास सुरू असतात. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका, मीही तुमच्यातूनच पुढे आलो आहे, असा दिलासा भुजबळांनी शिवसैनिकांना दिला.

(nashik SAKAL Special chalta bolta Dont worry I am also among you marathi news)

टीम नेमक्या कोणाच्या...

सध्या देशभरात आयपीएलचं वादळ सुरू आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी टीव्ही, मोबाईलसमोर आयपीएल पाहण्या गुंग आहे. मित्रमंडळींमध्ये होणाऱ्या चर्चादेखील आयपीएलच्याच. मात्र यात मोबाईलच्या काही अॅपमध्ये या खेळाच्या माध्यमातून स्वतःची टीम बनवून खेळ खेळतात.

अर्थात या खेळांमधून लाखो, करोडो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष खेळणाऱ्यांना असते. यात आर्थिक नुकसानदेखील संभवते. नाशिकमध्ये एका चौकात सायंकाळच्या सुमारास काही तरुण मंडळीत याच खेळण्यातून वाद सुरू झाला होता. तू सांगितलेल्या टीममुळे माझ नुकसान झालं.

दुसरा म्हणाला, मी सांगितलेल्या टीममुळे तुम्हाला फायदा झाला.असा हा वाद बराच काळ चालला. हे सर्व पाहणारे एक काका म्हणाले, ‘अरे जर तुमच्या इतक्या टीम आहेत, तर मग खऱ्या खेळातील नेमक्या टीम कोणाच्या? (latest marathi news)

हो, मला उभे राहायचेय..!

लोकसभा निवडणुकीच्या चर्चेचे काही प्रसंग विनोदीसुद्धा असू शकतात, याची प्रचिती युवकांच्या एका समूहाला आली. झाले असे, की हॉटेलमध्ये काही युवक गप्पा मारत खाद्य पदार्थांच्या प्रतीक्षेत बसलेले होते. त्यातच एक युवक ताडकन उभा राहून गप्पा मारू लागला.

क्षणभर कुणाला काही समजलेच नाही; पण मग समूहातील त्याचे इतर मित्र त्याला खुर्चीवर बसून घेण्यास सांगू लागले. हा पठ्ठ्या काही बसेना. इतक्यात विनोदी स्वभावाचा एक युवक त्याला उद्देशून म्हणाला, ‘लोकसभा निवडणुकीला उभे राहायचे का?

आत्तापासूनच तयारी करतोय? हे वाक्य ऐकताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. ‘हो, मला निवडणुकीत उभे राहायचे आहे’, असे म्हणत कावराबावरा झालेला तो युवक खुर्चीवर बसला आणि पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हास्य फवारे उडाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT