political esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! त्याला शब्दच सुचेना

SAKAL Special : मित्रांच्या घोळक्यात बढाया मारणाऱ्या एका कार्यकर्त्याचा सार्वजनिक कार्यक्रमात चांगलाच पाणउतारा झाला.

सकाळ वृत्तसेवा

त्याला शब्दच सुचेना...

चारचौघांत बोलणे वेगळे आणि व्यासपीठावर विचार मांडणे, यात बरेच अंतर असते. मित्रांच्या घोळक्यात बढाया मारणाऱ्या एका कार्यकर्त्याचा सार्वजनिक कार्यक्रमात चांगलाच पाणउतारा झाला. त्याचे झाले असे, की एका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम होता.

पाहुणे येण्यापूर्वी फुशारक्या मारणारा कार्यकर्ता सभागृहात पहिल्याच खुर्चीवर येऊन बसला आणि रिल्स पाहत बसला. सूत्रसंचालकाने शक्कल लढवत कार्यकर्त्याला कोणतीही कल्पना न देता अचानक व्यासपीठावर प्रास्ताविक करण्यासाठी बोलावले.

भांबावलेला कार्यकर्ता कसाबसा व्यासपीठावर उभा राहिला खरा; पण काय बोलावे तेच कळेना... काहीतरी बोलायचे ते बोलला आणि परत जागेवर जाऊन बसला. काही वेळापूर्वी गप्पा ठोकणाऱ्या कार्यकर्त्याला पंखा जोरात सुरू असतानाही चांगलाच घाम फुटला.

(nashik SAKAL Special chalta bolta He doesnt know words marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; रेल्वे वाहतूक ठप्प

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT