leader esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! ‘हाता’च्या घड्याळातील उलटे काटे

SAKAL Special : एखाद्या नेत्याला सर्वपक्षीय नेत्यांची मान्यता असते. म्हणजे तो कोणत्याही पक्षात असला तरी त्याला इतर पक्षांतील नेते आपलेच मानतात.

सकाळ वृत्तसेवा

‘हाता’च्या घड्याळातील उलटे काटे

एखाद्या नेत्याला सर्वपक्षीय नेत्यांची मान्यता असते. म्हणजे तो कोणत्याही पक्षात असला तरी त्याला इतर पक्षांतील नेते आपलेच मानतात. नाशिकमध्ये टोपीवाले आमदार याच ‘सूत्रा’त बसतात. त्यांचा पक्ष ‘हाता’च्या इशाऱ्यावर चालणारा असला तरी त्यांचे सगळे लक्ष हातातील ‘घड्याळा’वर असते.

त्यात वरिष्ठ नेत्यांचे फोन आता येऊ लागले आहेत. ‘काही करून तुम्ही उभेच राहा. पाहिजे ती मदत आम्ही करू’, असे आश्‍वासनही देऊन झाले; पण नेता काही तयार होईना. दिल्लीत आपल्याला भाषेचा ‘प्रॉब्लेम’ येईल आणि त्यांचे ‘हेड’ही आपल्याला कळणार नाहीत.

त्यामुळे ‘हातचं सोडून पळत्याच्या मागे’ लागण्यापेक्षा आपण शांत राहिलेले बरे, असे म्हणून ते निवडणूक लढायला नकार देतात. त्यात आता वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराची धुराही सोपविली आहे. पण कुठल्या पक्षाचा प्रचार करायचा, हेच कळत नसल्याने ‘हाता’च्या ‘घड्याळातील काटे उलटे फिरू लागले आहेत.

(nashik SAKAL Special chalta bolta Inverted hands in watch of Hatha marathi news)

पक्षाचा उमेदवार नाही, पण...

राजकारणात कधी कोणाला काय अडचण येईल, याचा काही नियम नाही. नाशिक लोकसभेची लढत अजूनही ठरलेली नाही. त्यात महायुतीची उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळणार, याचा कार्यकर्त्यांनाच काय पण नेत्यांनाही थांगपत्ता लागत नाही. त्यात एका राष्ट्रीय पक्षाचे एकमेव आमदार सध्या जास्तच चिंतेत आहेत. आपल्या पक्षाचा उमेदवारही रिंगणात नाही.

त्यामुळे प्रचार आपल्या सहकारी पक्षाचा उमेदवाराचा करायचा तर जास्त जवळीक ही विरोधी पक्षातील उमेदवारांसोबत आहे. त्यामुळे ‘धरलं तर चावतं अन्‌ सोडलं तर पळतं’, अशी गत या आमदारांची होऊन बसली आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच धुळ्यात प्रचाराला निघून जाण्याची त्यांनी तयारी केली आहे, आता बोला!  (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT