Narendra Modi  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता! महायुतीची पंचाईत मोदींनी सोडवावी

SAKAL Special : नाशिकमध्ये विद्यमान खासदार महायुतीचे असले, तरी येत्या निवडणुकीसाठी अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

महायुतीची पंचाईत मोदींनी सोडवावी

नाशिकमध्ये विद्यमान खासदार महायुतीचे असले, तरी येत्या निवडणुकीसाठी अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) छगन भुजबळ, शिवसेनेचे (शिंदे गट) हेमंत गोडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक इच्छुकांच्या नावांची चर्चा असली, तरी तिन्ही पक्षांच्या एकत्र येण्याने व उमेदवारीच्या रस्सीखेचीने महायुतीची शहरात चांगलीच पंचाईत झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी, असा सूर काहींनी आळवला होता. त्यामुळे स्वतः नरेंद्र मोदींनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवून या इच्छुकांमुळे नाशिकमध्ये महायुतीची झालेली पंचाईत सोडवावी, अशा चर्चा कट्ट्यावर बसणारे राजकीय विश्लेषक करू लागले आहेत.

(nashik SAKAL Special chalta bolta Modi should solve panchayat of Mahayuti maratyhi news)

शिंदेंनी मोदींच्या हाती दिला धनुष्यबाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे प्रचारसभेसाठी आले होते. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील दिग्गजांची उपस्थिती होती. सोशल मीडियावर ही सभा अनेकांनी लाइव्ह पाहिली. याच सभेतून सोशल मीडियाप्रेमींना चर्चेचा चांगलाच विषय मिळाला. पंतप्रधानांचे व्यासपीठावर आगमन झाले.

सत्कारादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी धनुष्यबाणाचे मानचिन्ह मोदींना भेट दिले. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शिंदेंनी ठाकरेंकडून काढून घेत स्वतःकडे घेतले. आता हाच धनुष्यबाण त्यांनी मोदींना दिला, त्यामुळे शिंदेंनी धनुष्यबाण अर्थात अख्खी शिवसेनाच मोदींच्या हवाली केली, अशा चर्चा सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून रंगू लागल्या आहेत. (latest marathi news)

...बरे झाले मुंबई वाऱ्या थांबल्या

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात नाशिक अन्‌ दिंडोरी मतदारसंघ नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला जात. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी काँग्रेसला उमेदवार नसल्याने ते आघाडीसाठी काम करत. निवडणुका आल्या, की स्थानिक काँग्रेस एका मतदारसंघासाठी आग्रही होते. मात्र, जागावाटपात पदरी काहीच मिळेना.

आताही हीच अवस्था काँग्रेसची झाली आहे. परंतु यंदा धुळे मतदारसंघात नाशिकच्या पदाधिकाऱ्यास उमेदवारीची संधी मिळाली. ही संधी मिळाल्यानंतर स्थानिक काँग्रेसमध्ये आनंद होत असला तरी अतंर्गत गटबाजी समोर आली आहे. धुळ्याच्या उमेदवारीवरून उमेदवारीसाठी आग्रही जिल्हाध्यक्षांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली.

या राजीनाम्यावर पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली. यात एका पदाधिकाऱ्याने यार.,. पहिल्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा झाला आहे. नाही, तर दरवेळेस जिल्हाध्यक्षांची पक्षाला उचलबांगडी करून काढण्याची कारवाई करावी लागते, असे सांगितले, तर दुसऱ्या पदाधिकाऱ्याने लागलीच बरे झाले राजीनामा दिला नाही, तर निवडणुकीनंतर त्यांना हटविण्यासाठी आपल्याला मुंबईवाऱ्या कराव्या लागल्या असत्या.

राजीनाम्याने आपल्या वाऱ्या थांबल्या राव, असे सुनावले. त्यानंतर जाऊ दे, आपण काही बोलायला नको, नाही तर आपण वाईट ठरू, असे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT