paper checker esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता! बोर्डाच्या पेपरने फोडला घाम

SAKAL Special : विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, शाळांना सुट्याही लागल्या आहेत. पण, शिक्षकांना बोर्डाकडून आलेले पेपर तपासून देण्यासाठी कसरत करावी लागते.

सकाळ वृत्तसेवा

बोर्डाच्या पेपरने फोडला घाम...

विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, शाळांना सुट्याही लागल्या आहेत. पण, शिक्षकांना बोर्डाकडून आलेले पेपर तपासून देण्यासाठी कसरत करावी लागते. एका शिक्षकाकडे गोणी भरून पेपर येतात.

अडीचशे पेपरचे गठ्ठे, त्यात पोरांनी काय दिवे लावले आहेत, याविषयी न सांगितलेले बरे. तर झाले असे, की शाळेत आलेले पेपर शाळेतच तपासण्याचा नियम आहे; पण शनिवार, रविवार सुटी असते. मग घरीही काही पेपर तपासू म्हणून हे महोदय काही पेपर घरी घेऊन येतात.

तपासलेले पेपर जमा करण्यासाठी मॉडिएटरकडे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते, की गठ्ठ्यातील काही पेपर गायब झाले आहेत. मग आता काय करायचे? कुठे गेले असतील हे पेपर म्हणून बराच वेळ डोकं खाजवतात.

दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर ही गोष्ट ते आपल्या सहकारी शिक्षकाला सांगतात. तेव्हा ते शिक्षक म्हणतात, मी उचलून कपाटात ठेवले होते. म्हटलं इकडे-तिकडे पडतील आणि गहाळ होतील म्हणून काळजीपोटी ठेवल्याचा खुलासा त्यांनी केला. तेव्हा भाऊंच्या जिवात जीव आला.

(nashik SAKAL Special chalta bolta Sweat broke with board paper)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT