science esakal
नाशिक

Sakal Special : चालता...बोलता...! विज्ञानाचे अनोखे प्रयोग

Sakal Special : एखादे काम प्रामाणिकपणे पार पाडण्यात शिक्षकांचा हात कुणीही धरू शकत नाही. सध्या परीक्षांचे वारे वाहू लागले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

विज्ञानाचे अनोखे प्रयोग

एखादे काम प्रामाणिकपणे पार पाडण्यात शिक्षकांचा हात कुणीही धरू शकत नाही. सध्या परीक्षांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्या. विज्ञानाचे प्रयोग व्यवस्थितरीत्या मांडून ते बाह्य परीक्षकांकडून तपासून घ्यावे लागतात. एका शाळेत विज्ञान प्रदर्शन होणार असल्याने शाळेच्या मॅडम दिवसभर प्रयोगशाळा स्वच्छतेच्या मागे लागतात.

संपूर्ण तयारी झाल्यानंतर मुख्याध्यापक त्यांना सांगतात, की बाह्य परीक्षक म्हणून आपल्याच शाळेचे शिक्षक उपस्थित राहणार आहेत. हे ऐकल्यावर मॅडमने दिवसभर केलेल्या मेहनतीवर पाणीच फिरले, आता बोला! (nashik Sakal Special chalta bolta marathi news)

क्रीडा स्पर्धांपेक्षा कामे झाली पाहिजेत

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याने सर्वच शासकीय कार्यालयांत निधी खर्चासाठी व कामे करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. प्रत्येक जण कामे उरकण्यामागे लागलेले आहे. जिल्हा परिषदेतही निधी खर्चासाठी लगबग सुरू आहे.

मात्र, यातच अधिकारी व कर्मचारी यांच्यात सांघिक भावना वाढावी, एकोपा राहावा या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. या स्पर्धांची तयारी सर्वच विभागांकडून सुरू आहे. मात्र, याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. झाले असे, की दोन कार्यकर्ते कामासाठी एका विभागात दाखल झाले होते.

त्या वेळी विभागातील संबंधित कर्मचारी टेबलावर नव्हते. त्यावर विचारणा झाली असता क्रीडा स्पर्धा सुरू असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांने क्रीडा स्पर्धापेक्षा कामे झाली पाहिजेत, कामे करा अशी संतप्त भावना व्यक्त केली. ही भावना व्यक्त केल्यावर दोघांनीही कार्यालयातून काढता पाय घेतला.

कवींची संख्या वाढली आणि लिंकच बंद केली

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मंगळवारी (ता. २७) कविसंमेलनाचे आयोजन महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवींना सहभागी होण्यासाठी एक व्हॉट्सॲप लिंकही देण्यात आली होती; पण दोन तासांतच ११० कवींनी नावनोंदणी केल्याने आयोजकांना कवींची संख्या पाहून लिंकच बंद करण्याची वेळ आली.

संमेलनात एवढ्या कविता सादर झाल्या तर सभागृहात बसलेला रसिक किती संयम ठेवेल, याचा विचार न केलेलाच बरा... आणि शहरात कवींची संख्या किती झपाट्याने वाढतेय, याचा विचार करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT