नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! विजय आपलाच, तरी नाराज

SAKAL Special : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती.

सकाळ वृत्तसेवा

विजय आपलाच, तरी नाराज...

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली अन् त्यातून करंजकरांचा पत्ता कट झाला आणि राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

त्या वेळी ‘विजय आपलाच आहे’, असे ठाकरे म्हणाले. नाशिक शिवसेनेची सर्व कार्यकारिणी या भेटीवेळी उपस्थित होती. मात्र जिल्हाप्रमुख असलेले विजय करंजकर दिसले नाहीत. त्यामुळे जर विजय आपलाच आहे, तर मग तो नाराज का आहे, असा सवाल शिवसेनेचे हितचिंतक करू लागले आहेत.

(nashik SAKAL Special chalta bolta Victory is yours but upset marathi news)

गजनी स्टार

काही लोकांना विसरण्याची फार सवय असते. चालता-बोलता ते गोष्टी विसरतात. याची आठवण होण्याचे कारण म्हणजे, स्वभावाने लेखक असलेल्या एका व्यक्तीची कार्यालयात नियुक्ती होते. आता नवीन जबाबदारी खांद्यावर आल्यामुळे आपला वरचष्मा दाखविण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होतात. संपूर्ण जिल्हाभर प्रस्त निर्माण व्हायला हवे म्हणून कानाकोपऱ्यातील मित्रांना, सहकाऱ्यांना फोन लावून ते विचारणा करू लागले.

एक दिवस अचानकपणे अनेक वर्षांपासूनचा मित्र त्यांना भेटायला कार्यालयात येतो. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर हा गजनी भाऊ त्याला ‘तुझे नाव काय’, म्हणून विचारतो. ‘अरे, तू माझे नावच विसरला, असाकसा मित्र’, म्हणून त्रागा करून हा मित्र तेथून निघून जातो. आपला आता गजनी झाल्याचे लक्षात येताच भाऊंनाही थोडे वाईट वाटते, पण करणार काय...  (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT