Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

Nashik News : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन नव्याने विकसित केलेल्या ई-कुबेर प्रणालीमुळे रखडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन नव्याने विकसित केलेल्या ई-कुबेर प्रणालीमुळे रखडले आहे. ही प्रणाली अंमलात आलेली नसतानाही जिल्हा कोशागार विभागाने प्रणालीव्दारे कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची भूमिका घेतल्याने कर्मचाऱ्यांचे मे महिन्यांचे वेतन रखडले आहे. वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे वेळेत वेतन करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Salary of Zilla Parishad employees stopped)

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन सीएमपीप्रणाली मार्फत होत होते. परंतु, शासनाने वेळेत वेतन होण्यासाठी ई-कुबेर प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीव्दारे शिक्षकांचे वेतन करण्यास प्रारंभ केला. सुरवातीस याचा फटका शिक्षकांच्या वेतनाला बसला. त्यामुळे शिक्षकांचे वेतन रखडले होते. मात्र, आता ई-कुबेर प्रणालीव्दारे शिक्षकांचे वेतन नियमित सुरू झाले आहे.

शिक्षकांपाठोपाठ आता शासनाने जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही ई-कुबेर प्रणालीव्दारे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ग्रामविकास विभागाने ही प्रणाली वित्त विभागामार्फत जोडण्यासाठी कार्यवाही सुरू केलेली आहे. या महिना अखेरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

असे असतानाही, राज्याच्या अर्थ विभागाने सर्व जिल्हा कोशागार विभागास ई-कुबेर प्रणालीव्दारे वेतन काढण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाप्रमाणे जिल्हा कोशागार विभागाने प्रणाली अमलात आणण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. यात कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र रखडले आहे.

"संघटनेने ग्रामविकास विभागास प्रणालीतील काही अडचणींबाबत लेखी पत्रव्यवहार केला आहे. राज्य संघटनेचे अध्यक्ष बलराज मगर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी ग्रामविकासमधील संबंधित अधिकाऱ्यांनी अर्थ विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ई- कुबेर प्रणालीची कार्यवाही सुरू असल्याने पूर्वीच्याच पद्धतीने म्हणजे सीएमपी प्रणालीने कर्मचाऱ्यांचे वेतन करावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच सकारात्मक निर्णय होईल." - विजयकुमार हळदे (अध्यक्ष जि.प. कर्मचारी युनियन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT