The first arena ceremony in Dindi was staged at Dhande Vasti in Karjat. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : कर्जतच्या धांडे वस्तीत पहिले उभे रिंगण अपूव उत्साहात

Nashik News : वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्‍वर पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण कर्जत येथे वारकऱ्यांच्या अपूर्व उत्साहात झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्‍वर पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण कर्जत येथील धांडे वस्ती येथे वारकऱ्यांच्या अपूर्व उत्साहात झाले. हे सोहळ्यातील दुसरे रिंगण होते. आज (सोमवारी) संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याने कर्जत तालुका अहिल्यानगर येथून सकाळी १० वा धांडे वस्तीकडे प्रस्थान केले. (Sant Nivruttinath Palkhi)

धांडे वस्तीला देवाचे नैवेद्य होऊन दुपारी एक वाजता फिरंगाई देवीच्या मंदिराजवळ श्रीनिवृत्तीनाथाच्या पादुका मंदिराजवळ सोहळ्यातील दुसरे व पाहिले उभे रिंगण प्रचंड उत्साहात झाले. या रिंगण सोहळ्याप्रसंगी पालखी सोहळ्यातील सर्व मानकरी, दिंडीवाले, पताका, झेंडेकरी, नगारावाले, वारकरी व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम जरीपटका शेवटच्या दिंडी पर्यत जाऊन आला, नंतर स्वराचा अश्व व देवाचा अश्व यांनी शेवटच्या दिंडीपर्यत दौडले. यानंतर अश्वांना देवाचा प्रसाद घेऊन अश्‍व पुन्हा स्थानावर पोहोचले. त्यानंतर भजन होऊन रिंगण झाले. यावेळी सोहळ्याचे मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, जयंत महाराज गोसावी.

बाळकृष्ण महाराज डावरे व संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान अध्यक्षा कांचनताई जगताप, सोहळाप्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त माधवदास राठी, श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त व प्रसिद्धी प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे आदी उपस्थित होते. रिंगण सोहळा माधवदास महाराज राठी रामकृष्णदास लहवीतकर व चोपदार सागर महाराज दौंड. (latest marathi news)

संजय तांबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने झाला. संस्थानचे विणेकरी कृष्णा रायते, ज्येष्ठ वारकरी गणपत गाडेकर, माजी विश्वस्त पुंडलिक थेटे आदी उपस्थित होते. मुक्कामी कोरेगाव ग्रामस्थांच्यावतीने पालखीचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करून निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले.

यंदा श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचे ७५१वा जन्मोत्सवी वर्ष असून यावर्षी आनंदाने सर्वत्र ठिकाणी साजरे होत आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात ५२ दिंड्या सहभागी असून यंदा वारीत वारकऱ्यांची उपस्थिती वाढली आहे. अत्यंत शिस्तबद्धरित्या चाललेला हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने उद्या रवाना होईल, अशी माहिती संस्थानचे प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT