Prakashrao Prabhune Maharaj and officials of Breath Foundation during the departure of the team providing medicine to the patients. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : वारकऱ्यांसाठी रुग्णवाहिकेसह ‘श्वास’तर्फे डॉक्टरांचे पथक; 4 डॉक्टर सतत 28 दिवस देणार सेवा

Nivruttinath Palkhi : त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पदयात्रेदरम्यान वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा म्हणून औषधांनीयुक्त अद्यावत रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) व चार डॉक्टरांचा ताफा सोबत देण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sant Nivruttinath Palkhi : संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि श्वास फाउंडेशनतर्फे आरोग्य पथक पुरविण्यात आले असून, या पथकाचे पालखीबरोबर प्रस्थान झाले. पुढील २८ दिवस चालणाऱ्या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पदयात्रेदरम्यान वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा म्हणून औषधांनीयुक्त अद्यावत रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) व चार डॉक्टरांचा ताफा सोबत देण्यात आला आहे. (team of 4 doctors by Shwasa with ambulance for devotees)

या सेवेचा प्रारंभ श्वास फाउंडेशनतर्फे कार्तिकेयनगर येथे प्रकाशराव प्रभुणे महाराज, श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. अंबादास कुलकर्णी, ॲड. श्याम घरटे, हेरंब गोविलकर, विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष विराज लोमटे, विहिंपचे प्रांतमंत्री अनिलराव चांदवडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रकाशराव प्रभुणे महाराजांनी वारकऱ्यांची पंढरपूरची ओढ व भगवंताप्रती असणारे उत्कट प्रेम आणि दिंडीतील संस्कार परंपरा याविषयी निरूपण केले व श्वास फाउंडेशनच्या कार्याच्या वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. (latest marathi news)

हेरंब गोविलकर यांनी प्रास्ताविकात विश्व हिंदू परिषदेच्या सेवाकार्याची माहिती दिली. श्वास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी ७० हजार आयुष्मान कार्ड काढून केलेली संस्थेची सुरवात, तर सुसज्ज हॉस्पिटलचा आजपर्यंतचा प्रवास मांडला. दिंडीच्या प्रवासादरम्यान मुक्कामस्थळी दर दिवशी विहिंप, आयुर्वेद महाविद्यालय व सेवा संघ आणि श्वास फाउंडेशनचे चार स्वयंसेवक आरोग्य पथकाच्या मदतीसाठी जातील, असे सांगितले.

वारीला सेवा देणाऱ्या सर्व टीमचा व अखंड वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे सचिव मकरंद वाघ यांनी संस्थेला वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे आभार मानले. नगरसेविका प्रतिभाताई पवार, श्री. राजपूत, संजय दंडगव्हाळ, प्रमोद पाटील, किशोर सोनवणे, दत्तू वाळे, प्रेमराज पटेल तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT