Donor devotee Shalini Pathak and family performing palkhi puja at the Trust office on Tuesday on the occasion of Durgashtami, the Chaitrotsav of Adimaye.
Donor devotee Shalini Pathak and family performing palkhi puja at the Trust office on Tuesday on the occasion of Durgashtami, the Chaitrotsav of Adimaye. esakal
नाशिक

Saptashrungi Devi Chaitrotsava : आदिमायेच्या पालखी पूजनाने चैत्रोत्सवास प्रारंभ; आभूषणांची आज सवाद्य मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा

Saptashrungi Devi Chaitrotsava : आद्यशक्तिपीठ सप्तशृंगगड येथे मंगळवार (ता. १६)पासून नवचंडी याग व आदिमायेच्या पालखी मिरवणुकीने अनौपचारिकपणे चैत्रोत्सवास प्रारंभ झाला. बुधवारी (ता. १७) रामनवमी आदिमायेच्या पंचामृत महापूजेने परंपरेनुसार चैत्रोत्सवास प्रारंभ होत आहे. सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार ५६९ फूट उंचीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास आज दुर्गाष्टमीनिमित्त आदिमायेची सकाळी पंचामृत महापूजा होऊन साडेनऊला पुरोहितांच्या मंत्रघोषात नवचंडी यागास प्रारंभ झाला. (nashik Saptashrungi Devi Chaitrotsav begins with palkhi worship of Adimaya marathi news)

दुपारी चारला आदिमायेची मूर्ती व पावलांच्या पालखीचे ट्रस्टच्या कार्यालयात आदिमायेस सोन्याचे २१ तोळे अलंकार करणाऱ्या देणगीदार भाविक शालिनी पाठक व परिवाराच्या हस्ते पूजन होऊन सवाद्य मिरवणूक काढून नगरप्रदक्षिणा करण्यात आली. या वेळी शेकडो भाविक पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी सातला आदिमायेच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक व पंचामृत महापूजेने चैत्रोत्सवास परंपरेनुसार प्रारंभ होईल.

चैत्रोत्सवाच्या पहिल्या माळेस श्री भगवतीच्या दरबारात उपस्थित राहण्यासाठी गडाकडे येणारे रस्ते महिला मंडळासह भाविकांनी फुलून गेले आहेत. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपासून प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल होण्यास सुरवात झाली असून, ट्रस्ट व ग्रामपंचायतीची यंत्रणा चैत्रोत्सवासाठी सज्ज झाली आहे.

बुधवारी सकाळी सहाला श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे ब्रह्मवृंदांना वर्दी देऊन ट्रस्ट कार्यालयात आदिमायेच्या दागिन्यांचे पूजन होईल. यानंतर आई भगवतीच्या जयघोषात दागिन्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. सकाळी सातपासून मुख्य जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलाणी यांच्या हस्ते सपत्नीक देवीच्या पंचामृत महापूजेस सुरवात होईल. तत्पूर्वी, मंदिराची प्रक्षालय पूजा व मूळ मूर्तीचे पाद्यपूजन होईल. (latest marathi news)

त्यानंतर श्री भगवतीस नवमहावस्त्र नेसवून सोन्याचे मुकुट, कमरपट्टा, पावले या अलंकारांसह सोन्याचे मंगळसूत्र, मोहनमाळ, नथ, कर्णफुले, कोहिरी हार आदी आभूषणांचा विधीवत साजशृंगार करण्यात येईल. या वेळी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा सप्तश्रृंगीदेवी न्यासाचे अध्यक्ष बी. व्ही. वाघ, कळवणचे तहसीलदार, विश्वस्त अॅड. ललित निकम, भूषणराज तळेकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, ॲड. दीपक पाटोदकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सरपंच रमेश पवार, सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी आदी उपस्थित राहतील.

खासगी वाहनांना प्रवेश बंद

मंगळवारी दिवसभर गडावर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला खेळणी, कटलरी दुकाने, हॉटेल्स, पूजेचे साहित्य, प्रसादाची दुकाने थाटण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू होती. बुधवारी सकाळपासून नांदुरी- सप्तश्रृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.

या कालावधीत फक्त अधिकारी, मालवाहतुकीसाठी नोंदणी करण्यात आलेल्या खासगी वाहनांनाच गडावर सोडण्यात येईल. दरम्यान पोलिस बंदोबस्त, आरोग्य यंत्रणा, विद्युत कर्मचारी, राज्य परिवहन महामंडळाच्या बस आदी प्रशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी बुधवारी सकाळपासून गडावर हजेरी लावणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT