Crack prevention team at road esakal
नाशिक

Saptshringi Gad : सप्तशृंगी गड घाट रस्ता 23, 25 व 26 सप्टेंबरला सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत बंद राहणार..

Saptshringi Gad : नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिला आहे.

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

वणी : श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्याच्या सुरु असलेल्या दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी २३ सप्टेंबर तसेच २५ व २६ सप्टेंबर हे तीन दिवस सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ( पाच तास ) नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिला आहे. सप्तश्रृंगी गडाावर श्री. सप्तश्रृंग निवासीनी देवी नवरात्र उत्सव ता. ०३/१०/२०२४ ते १२/१०/२०२४ तसेच कोजागिरी पौणिमा ता. १६/१०/२०२४ ते १७/१०/२०२४ या कालावधीत होणार आहे. (Saptashrungi Gad Ghat Road will be closed )

त्याअनुषंगाने, सहाय्यक अभियंता श्रेणी १. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवण नाशिक यांनी ता २०/०९/२०२४ रोजी सप्तश्रृंगी गड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत सुरु असलेलया कामाकरिता रस्ता बंद करण्याबाबतचे पत्र सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याअनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी सप्तश्रृंगीगड ते नांदुरी या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसविणे व बॅरियर बसविणे हे काम प्रगतीपथावर आहे. (latest marathi news)

या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचे काम सुरु असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ता. २३/०९/२०२४, २५/०९/२०२४ व २६/०९/२०२४ सकाळी ७ ते दुपारी १२.०० या वेळेत व तारखेस वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याने तसेच, सदर रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे नियोजित तारखांना होणे आवश्यक असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ नुसार सदरचा मार्ग बंद करण्यात येणार असल्याचा आदेश दिला असून कामा दरम्यान कोणतीही जिवित व वित्त हानी होणार नाही याची संबधीत यंत्रणा यांनी नोंद घेण्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT