Nashik saptsringi gad ghat bus accident one died 23 injured watch bus conductor Video  
नाशिक

Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये २४ प्रवाशांसह एसटी दरीत कोसळली! कंडक्टरचा व्हिडीओ आला समोर

रोहित कणसे

Nashik ST Bus Accident : नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यानंतर आता एसटी बसमधील वाहकाचा व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान या अपघातानंतर बसच्या वाहकांने अपघात कसा झाला याबद्दल माहिती दिली आहे. अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची मुक्कामी बस असून त्यात २४ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान बसला गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असतांना हा अपघात झाला.

कंडक्टरने काय सांगितलं...

गाडी मुकामाला होती.रात्री जेवण करून झोप वगैरे व्यवस्थित झाली. सकाळी साडेसहा वाजता बस स्टॉपवरून निघालो. पण दहा बारा मिनीटानंतर गणपती पाँइट येथे धुकं भयानक होतं. त्या धुक्यामुळं वळण चालकाच्या लक्षात आलं नसावं असं वाटतं अशी माहिती बसमधील वाहकाने दिली आहे. तसेच त्यांनी अंदाजे २२ ते २३ प्रवासी होते असेही सांगितले.

रुग्णांवर उपचार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार या एसटी बसमध्ये एकूण प्रवासी २४ (चालक व कंडक्टर सह) प्रवास करत होते. यापैकी १ मयत (महिला-अशाबाई राजेंद्र पाटील, मुडी ता अंमळनेर) ०६ रुग्ण वणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १७ रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी शिफ्ट केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT