Nashik Save River campaign collected Five and half ton garbage
Nashik Save River campaign collected Five and half ton garbage sakal
नाशिक

नाशिक : ‘नदी वाचवा’ अभियानात साडेपाच टन कचरा संकलित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका व राष्ट्रीय छात्र सेना महाराष्ट्र बटालियन (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नदी वाचवा’ अभियान सुरू आहे. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात या अभियानाला सुरवात झाली. या अभियानाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसांत साडेपाच टन कचरा संकलन झाले.

महापालिका आयुक्त रमेश पवार, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) महाराष्ट्र बटालियन कमांडिंग ऑफिसर अलोककुमार सिंग आदीच्या उपस्थितीत वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभियानाचा शुभारंभ झाला. अभियानात शहरातील विविध पाच सामाजिक व स्वयंसेवी संस्था, महापालिकेचे १५० कर्मचारी, मलेरिया विभागाचे २० कर्मचारी, युनाटेड वी स्टॅन्ड फाउंडेशनचे २० सदस्य, राष्ट्रीय छात्र सेनेचे महाराष्ट्र बटालियन कॅडेट्स (१७४) आदींनी श्रमदान करून नंदिनी नदी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहभागातून सदर अभियानाद्वारे पहिल्या दिवशी २. ५ टन, दुसऱ्या दिवशी ३. ५ टन आणि एकूण ५ .५ कचरा संकलित करून घंटागाडी वाहनांद्वारे घनकचरा केंद्रात पाठविला.

आज सिडकोत मोहीम

सलग दुसऱ्या दिवशी सातपूर येथे नंदिनी नदी किनारी राष्ट्रीय छात्रसेनेचे महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर अब्बास अली, एलटी सचिन सोनवणे, एलटी आर. आर. शिदे, एलटी वाय. जी. भदाने, मेजर विक्रांत कावळे व सातपूर विभागातील माधुरी तांबे, शिवाजी काळे, अधिक्षक विक्रम दोंदे, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र नेटावटे, स्वच्छता मुकादम अशोक उशीरे तसेच, समाजसेवक चंदू पाटील, युनायटेड वी स्टॅन्डचे अध्यक्ष सागर मटाले, नीलेश पवार, गौरव रहाणे आदींनी श्रमदान केले. मंगळवारी सिडको विभागात उंटवाडी परिसरातील नंदिनी नदी किनारी महापालिका व राष्ट्रीय छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

नदी वाचवा अभियान हे फक्त स्वच्छता अभियानाचा फक्त एक उपक्रम न राहता त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. नाशिक शहरातील गोदावरी, कपिला, नंदिनी या सारख्या नद्या स्वच्छ केल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल.

- रमेश पवार, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT