PET Exam  esakal
नाशिक

PET Exam : पुणे विद्यापीठाच्‍या ‘पेट’ला मुहूर्त; रिक्‍त जागांची माहिती अद्ययावत करण्याच्‍या सूचना

Nashik News : संशोधन मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करण्याबाबत सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : संशोधन मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करण्याबाबत सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जारी केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० जूनपर्यंत मुदत दिली आहे. ही माहिती अद्ययावत केल्‍यानंतर ‘पेट’ परीक्षा आयोजनाचा मार्ग मोकळा होणार आहे. पुणे विद्यापीठातर्फे प्रांगणातील सर्व विभाग प्रमुखांना तसेच संलग्‍न महाविद्यालयाच्‍या प्राचार्य, संचालकांसाठी ही सूचना जारी केली आहे. (PET Exam)

या परिपत्रकात म्‍हटले आहे, की आगामी पीएच्.डी. प्रवेश परीक्षा (पेट) आयोजित करण्याच्या अनुषंगाने पीएच. डी. मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. जागा अद्ययावत करताना संशोधन केंद्र व संशोधन मार्गदर्शकांनी मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी.

यापूर्वी रिक्त जागा अद्ययावत केल्या आहेत किंवा संशोधन मार्गदर्शकांकडे सद्यःस्थितीत जागा रिक्त झाल्या आहेत किंवा ज्या संशोधन मार्गदर्शकांना नव्याने संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे, अशा मार्गदर्शकांना पुन्‍हा किंवा नव्याने जागा अद्ययावत करायच्या आहेत. (latest marathi news)

त्या संशोधन मार्गदर्शकांनी त्यांच्या लॉगीनमधून त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत कराव्‍या लागतील. त्‍यानंतर संबंधित संशोधन केंद्रांनी त्यांचे मार्गदर्शकाकडील पुन्‍हा किंवा नव्याने अद्ययावत केलेल्या रिक्त जागांना प्रवर्गनिहाय ऑनलाइन पद्धतीने मान्यता देण्याबाबत सूचना केल्‍या आहेत.

यापूर्वी रिक्त जागा अद्ययावत केलेल्या आहेत, परंतु त्यांना जागा अद्ययावत करण्याची आवश्यकता वाटत नाही, अशा संशोधन मार्गदर्शकांनी रिक्त जागा अद्ययावत करण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया पूर्ण करताना काही तांत्रिक अडचण आल्यास, प्रशासकीय भवन, पहिला मजला येथील आय. टी. सपोर्ट संपर्क येथे संपर्क साधण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT