exam  esakal
नाशिक

Nashik News : स्टार्स प्रकल्पातंर्गत मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक जाहीर; 10 ते 12 जुलै निश्चित

Nashik : विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.

विजय पगारे

Nashik News : राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) कार्यक्रमातंर्गत सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ३ री ते ९ वीच्या विद्यार्थ्यांबरोबरच खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे. ( Schedule of evaluation test under stars project announced)

त्यानुसार येत्या १० ते १२ जुलै या कालावधीत तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येणार आहे. यंदा प्रथमच नववीच्या वर्गाचा समावेश करण्यात आला आहे. खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यानाही ही परीक्षा द्यावी लागणार आहे. उच्च प्राथमिक शाळांमधील जवळपास निम्मे विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित राहिल्यास संपादणूक पातळीत वाढ करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल ही वस्तुस्थिती विचारात घेऊन खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि दोन या दोन चाचण्या आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याची राज्य पुरस्कृत योजना २०११ पासून राबवण्यात येत आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचण्या हा एक शैक्षणिक उपक्रम आहे.त्यात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसारखे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येते.त्यासाठी चाचणी विकसन कार्यशाळा,कागद खर्च,छपाई खर्च, वाहतूक खर्च इत्यादी घटकासाठी निधी खर्च करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे एससीईआरटीच्या संचालकांच्या प्रस्तावानुसार राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्तरावरुन करण्यात येणार आहे.(latest marathi news)

'‘स्टार्स’ प्रकल्पातंर्गत गेल्या तीन चार वर्षापासून हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. त्याची फलश्रुती चांगली दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थी संपादणूक पातळी कळते व पुढील सुधारणा आणि नव्याने लागू करण्यात येणाऱ्या कार्यवाहीसाठी नियोजन करता येते. यंदा प्रथमच नववीच्या वर्गाचा समावेश करण्यात आला आहे.''- राहुल रेखावार, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

''शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी संकलित मूल्यमापन चाचणी हा एक चांगला उपक्रम असून या माध्यमातून विद्यार्थी प्रगतीत येणाऱ्या समस्यां समजण्यास मदत मिळते तसेच विद्यार्थीस्तर निश्चितीस शिक्षकांना योग्य संधी मिळते.''- डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT