Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : शाळेच्या शिपायानेच घातला 44 लाखांना गंडा! पालकांकडून शैक्षणिक शुल्क घेतले स्वत:च्या बँक खात्यावर

Fraud Crime : पालकांकडून शाळेची शैक्षणिक फी जमा करून घेतली आणि शाळेला तब्बल ४४ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील नामांकित शाळेतील शिपायानेच पालकांना स्वत:च्या बँकेचा खाते क्रमांक देत तर कधी फोन पेवर पालकांकडून शाळेची शैक्षणिक फी जमा करून घेतली आणि शाळेला तब्बल ४४ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात संशयित शिपायाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास भास्कर आहेर असे संशयित शिपायाचे नाव आहे. (school constable himself took Rs 44 lakh from parents in education fees )

संदीप पुरी ( रा. भोसला मिलिटरी स्कुल, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आहेर हा भोसला मिलिटरी स्कुलमधील लेखा विभागात शिपाई या पदावर कार्यरत होता. मे २०२३ ते डिेसेंबर २०२३ या दरम्यान संशयित आहेर याने शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी येणार्या पालकांना स्वत:च्या कोटक महिंद्रा बँकेचा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड नंबर दिला. तसेच, फोन पेसाठी मोबाईल क्रमांक देत, हे क्रमांक भोसला मिलिटरी स्कुलचे असल्याचे त्याने पालकांना भासविले.

त्यानुसार, पालकांनीही त्याच्यावर विश्वास ठेवून शैक्षणिक शुल्क संशयित आहेर याने दिलेल्या बँक खात्यावर तर कधी फोन पेद्वारे भरले. अशारितीने संशयिताने तब्बल ४४ लाख ८ हजार रुपये स्वीकारून संस्थेलाच गंडा घातला आहे. सदरची बाब उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गंगापूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक निखिल पवार हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident : भीषण रेल्वे दुर्घटना! मालगाडी अन् पॅसेंजर ट्रेन भिडल्या; अनेक प्रवाशांचा मृत्यू

Nagarpalika Election: नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम कसा? आचारसंहितेचा नियम काय? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या एका क्लिकवर

Kalyan News: कल्याण शीळ रोडवर २ दिवस वाहतुकीत बदल, 'असे' असतील पर्यायी मार्ग

Latest Marathi News Live Update : कौटुंबिक वादातून मुलानेच केली जन्मदात्याची हत्या

Winter Birds: थंडीची चाहूल लागताच पाहुणे पक्ष्यांचे आगमन; जाणून घ्या सोलापूरमध्ये कुठे आणि कसे पाहाल पक्षीवैभव!

SCROLL FOR NEXT