Viral Video Sakal
नाशिक

Video: नाशिकमध्ये पातेल्यात बसून विद्यार्थी ओलांडतात नदी

नदीचे पाणी खोल असून मुलांना शाळेत जाण्यासाठी नदी ओलांडावी लागते.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक येथील शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नदीच्या पाण्यातून जिवघेणा प्रवास करून हे मुलं नदी ओलांडत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तर काही व्यक्ती त्या विद्यार्थ्यांना खांद्यावर बसवून नदी ओलांडायला मदत करत आहेत. हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील असून सदर नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

(Nashik Viral Video)

दरम्यान, लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी खोल पाणी असलेली नदी ओलांडावी लागते. तर लहान लहान मुलांना पातेल्यात बसवून नदीच्या पलीकडे नेण्यात येत असल्याचं पहायला मिळत आहे. त्याबरोबर काही व्यक्ती विद्यार्थ्यांना खांद्यावर बसवून नदी ओलांडण्यासाठी मदत करताना या व्हिडिओत दिसत आहे.

राज्यात यावर्षी काही ठिकाणी मोठ्या पावसामुळे पूर आला होता. त्यातच पूल वाहून जाणे, रस्त्यावर पाणी येणे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळेतील मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून शाळेत जाण्यासाठी सोय करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

SCROLL FOR NEXT