नाशिक

नाशिकमध्ये कडेकोट सुरक्षा

CD
पान-३ मेन --------- फोटो : H33910/ H33931 नाशिक : रामतीर्थ परिसरात तैनात करण्यात आलेला बंदोबस्त. दुसऱ्या छायाचित्रात रामतीर्थ परिसरात लावलेले सीसीटीव्ही. --------------------- गोदाघाटाला सुरक्षेचे अभेद्य कवचआयबी, एनएसजी अन् एटीएसची पथके तैनात ः राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या ध्वजारोहण ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता.३१) होणाऱ्या सिंहस्थाच्या ध्वजारोहण विशेष सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विशेषतः पंचवटी आणि जुन्या नाशिक भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार व आमदारांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी), दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि विशेष तपास पथकांचे अधिकारी व जवान नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सुरक्षेचा भाग म्हणून एनएसजीच्या पथकांनी संपूर्ण गोदाघाटाचा ताबा घेतला आहे. शहरातील प्रत्येक घडामोडीवर आणि संशयित हालचालींवर यंत्रणांची करडी नजर आहे. दहशतवादविरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत शहरातील हॉटेल्स व लॉजेसची कसून तपासणी सुरू केली आहे. तेथे थांबलेल्या प्रत्येक नागरिकाची सखोल चौकशी केली जात आहे. याशिवाय बसस्थानके, रेल्वेस्थानक आणि मुख्य बाजारपेठांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.१६-१ छावणीचे स्वरूप ध्वजारोहण सोहळ्याच्या मुख्य ठिकाणासह संपूर्ण गोदाघाट परिसरात कडेकोट पहारा देण्यात आला आहे. गोदाघाटाभोवती १०० पेक्षा जास्त ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले असून विविध पॉइंट्‌सवर सशस्त्र पोलीस तैनात आहेत. पंचवटी आणि जुन्या नाशिक परिसरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून वाहतुकीच्या मार्गातही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सोहळ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी सुमारे शंभर ते दीडशे उच्च प्रतीचे एआयबेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ---------------------२०-२ सुरक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये व यंत्रणा पथक ........... संख्या तपशील स्थानिक पोलिस ...........३ हजार पोलिस अंमलदार व अधिकारी परजिल्ह्यातील पोलिस ........ १,५०० अतिरिक्त पोलीस कर्मचारी होमगार्ड (गृहरक्षक) ...... १ हजार गृहरक्षक दलाचे जवान वाहतूक नियंत्रण ........... ७०० वाहतूक अधिकारी व अंमलदार विशेष यंत्रणा .......... आयबी, एनएसजी, एटीएस, विशेष पथके एआय बेस सीसीटीव्ही ...... १०० ते १५० गोदाघाट परिसर १०० हून अधिक बॅरिकेटींग व फिक्स पॉइंट्‌स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

SCROLL FOR NEXT