नाशिक

सुदृढ निरामयी आरोग्‍याचा ज्‍येष्ठांनी दिला संदेश

CD
फोटो : H31303,H31304, H31286, H31284, H31280, H31305, H31291 --- निरामयी आरोग्‍यासाठी ज्‍येष्ठ नागरिकांचा वॉक ‘सकाळ वॉकेथॉन’ला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; व्यायामाचे धडे अन् संगीताचा ठेका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : मंद वाऱ्याची झुळूक अन्‌ कोवळ्या सूर्यकिरणांच्‍या साक्षीने ज्‍येष्ठ नागरिकांनी चालत सुदृढ, निरामयी आरोग्‍याचा संदेश दिला. औचित्‍य होते, रविवारी (ता. ४) गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर भाजी मार्केट मैदानाजवळील समर्थ जॉगिंग ट्रॅकवर ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित व ‘सुहाना स्वास्थ्यम’ प्रस्तुत ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’ वॉकेथॉन उपक्रमाचे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित उपक्रमात शहरातील विविध भागातून आलेल्‍या वय वर्ष ५० हून अधिकच्‍या नागरिकांनी सहभागी होत उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते झेंडा दाखवत वॉकला सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार प्रा. देवयांनी फरांदे, मॅग्नम हॉस्‍पिटलचे प्रमुख व हृदयरोगतज्‍ज्ञ डॉ. मनोज चोपडा, गोदाश्रद्धा फाउंडेशनचे प्रमुख व नगरसेवक तथा पश्‍चिम विभागाचे सभापती सुरेशअण्णा पाटील, नगरसेविका स्‍वाती भामरे, वक्रतुंड हॉस्‍पिटलचे डॉ. अखिल चौधरी, डॉ. विक्रम पाटोळे, डॉ. सागर मंडलिक, रायते पाटील पॅरालिसिस, रिहॅबिलिटेशन ॲन्ड आयुर्वेदा सेंटरचे डॉ. विशाल रायते- पाटील तसेच कौशल्‍य गॅस्‍ट्रो, लिव्‍हर ॲन्ड न्‍युट्रिशन क्‍लिनिकचे डॉ. महेश मांगुळकर, डॉ. सुप्रिया मांगुळकर, जितेंद्र येवले, फिटनेस ट्रेनर पूनम आचार्य, ठक्‍कर ग्रुपचे मार्केटिंग हेड किरण कराड, वॉटरमेलन फुड्‌स ॲन्ड ब्रेव्‍हरेजेसचे रामराव पाटील, अजिंक्‍य फरांदे आदी उपस्‍थित होते. फ्रवशी ग्रुप ऑफ स्‍कुलचे प्रमुख रतन लथ यांनी सदिच्‍छा भेट दिली. तत्‍पूर्वी मान्‍यवरांचे स्‍वागत ‘सकाळ’च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्‍यवस्‍थापक संजय पाटील, मुख्य व्‍यवस्‍थापक (जाहिरात) मारुती दातीर, वरीष्ठ व्‍यवस्‍थापक (वितरण) बळीराम पवार यांनी केले. ‘वॉकेथॉन’ मध्ये सहभागींमध्ये मोठा उत्‍साह बघायला मिळाला. कुणी आकर्षक वेशभूषा करुन, तर कुणी कलांचे सादरीकरण करुन उपक्रमात उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदविला. ‘चला चालूया… निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या दिशेने!’ असा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी प्रा. देवयानी सुहास फरांदे (आमदार, नाशिक मध्य), सोनी पैठणी नाशिक- येवला, मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल, नाशिक हे मुख्य प्रायोजक होते. तर ठक्कर्स ग्रुप लिमिटेड व वक्रतुंड हॉस्पिटल पॉवर्ड बाय स्पॉन्सर्ड होते. कौशल्या गॅस्ट्रो, लिव्हर ॲन्ड न्यूट्रिशन क्लिनिक (नाशिक), रायते पाटील पॅरालिसिस, रिहॅबिलिटेशन ॲन्ड आयुर्वेदा सेंटर आणि गोदा श्रद्धा फाउंडेशन हे असोसिएट पार्टनर होते. सेल्स ॲन्ड मार्केटिंग, वॉटरमेलन फूड्स ॲन्ड ब्रेव्हरेजेस प्रा. लि. ब्रेव्हरेजेस पार्टनर, क्रिएटिव माइंड एंड मीडिया सर्व्हिसेस पीपल पार्टनर, सोनी गिफ्ट प्रायव्हेट लिमिटेड गिफ्ट पार्टनर, मातोश्री ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड ट्रॅव्हल पार्टनर होते. प्रास्‍ताविकात अभय सुपेकर म्‍हणाले, की सलग दुसऱ्या वर्षी आयोजित या उपक्रमाला प्रतिसाद वाढला आहे. कुटुंबातील प्रत्‍येकासाठी ‘सकाळ’तर्फे विशेष उपक्रमांचे आयोजन केले जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच गोदाश्रद्धा फाउंडेशनचे सुरेशआण्णा पाटील यांनीही शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमाचे निवेदन सोनाली म्‍हरसाळे यांनी केले. -----चौकट कुंभमेळ्यात भाविकांच्‍या स्‍वागतासाठी व्‍हा सज्‍ज : फरांदे आपल्‍या नाशिकचा उत्‍सव असलेल्‍या सिंहस्‍थ कुंभमेळ्याला ३१ ऑक्‍टोबरला ध्वजारोहणाने सुरुवात होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांच्‍या मार्गदर्शनाखाली आपल्‍याला प्रत्‍येकघरी भगवा ध्वज फडकवायचा आहे. कुंभमेळ्यात देश- विदेशातून येणाऱ्या भाविकांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज व्‍हावे, असे आवाहन या उपक्रमानिमित्त आमदार देवयानी फरांदे यांनी केले. उपस्‍थित ज्‍येष्ठ नागरिक नियमित चालतात, म्‍हणून त्‍यांचे आरोग्‍य निरोगी असून, इतरांनीही त्‍यांच्‍याकडून प्रोत्‍साहित होण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. -----------चौकट तरुणांनी घ्यावा ज्‍येष्ठांचा आदर्श : डॉ. चोपडा आजच्‍या उपक्रमात महिलांचे प्रमाण पन्नास टक्‍यांहून अधिक असल्‍याचे पाहून खुप आनंद झाला. महिला वर्ग आरोग्‍याविषयी सजग असल्‍याचे यातून सिद्ध होते. सर्वच ज्‍येष्ठांमध्ये सुदृढ आरोग्‍य राखण्यासाठी असलेला उत्‍साह पाहता, तरुणाईने ज्‍येष्ठांचा आदर्श घ्यावा, असा सल्‍ला मॅग्‍नम हॉस्‍पिटलचे प्रमुख व हृदयरोग तज्‍ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी दिला. --------------- संस्‍था, मान्‍यवरांचा सन्‍मान... उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या संस्‍थांचे पदाधिकारी, तसेच मान्‍यवरांचा या वेळी भेटवस्‍तू देऊन सन्‍मान केला. ७४ वर्षीय निवृत्त पोलिस अधिकारी सुभाष बागूल, तसेच ९४ वर्षीय बालासुब्रमन्‍यम यांचा सत्‍कार केला. याशिवाय सप्तशृंगी मंडळ, स्‍वामी समर्थ ग्रुप, संध्या छाया ग्रुप पदाधिकाऱ्यांचा सत्‍कार केला. फेसकॉमतर्फे अध्यक्ष अशोक होळकर यांनी सत्‍कार स्‍वीकारला. तर दुर्गामाता ज्‍येष्ठ नागरिक संघ, कालिकादेवी ज्‍येष्ठ नागरिक संघ, तसेच शिवानंद, साईनंद, स्‍वानंद या हास्‍यक्‍लबचे पदाधिकारी, डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मंडळ, गोविंदनगर ज्‍येष्ठ नागरिक संघ, रोटरी हेल्‍थ सोसायटी आदी संस्‍था, संघटना, व्‍यक्‍तींना सन्‍मानित केले. ----------चौकट संगीताच्‍या तालावर थिरकले वॉकपूर्वी उपस्‍थित सर्वांकडून हलकेफुलके व्‍यायाम करुन घेतले. फिटनेस ट्रेनर पूनम आचार्य यांनी हात-पायाचे, मानेच्‍या व्‍यायामांचे प्रात्‍येक्षिक दाखविले. तर वॉक पूर्ण झाल्‍यानंतर उपस्‍थित सर्वांसाठी झुंबाचे सत्र आयोजित केले होते. यावेळी संगीताच्‍या तालावर थिरकतांना उपस्‍थित ज्‍येष्ठांनी जल्‍लोष केला. त्‍यांना आमदार फरांदे यांच्‍यासह मान्‍यवरांनी साथ देत प्रोत्‍साहित केले. ---चौकट क्षणचित्रे.... * ज्‍येष्ठ नागरिक रत्‍नाकर चावरे यांच्याकडून उपक्रमाच्‍या प्रारंभी शंखनाद * उपक्रमात झळकले वाचनाचे महत्त्व सांगणारे फलक * हास्‍यक्‍लब सदस्‍यांच्या हाती हसण्याचे महत्त्व सांगणारे फलक * एका रांगेत चालत ज्‍येष्ठांनी घडविले शिस्‍तीचे दर्शन * वॉक पूर्ण झाल्‍यावर विविध मनोरंजक उपक्रमांनी वेधले लक्ष * हास्‍यक्लबच्‍या सदस्‍यांकडून हास्‍ययोगाचे प्रात्‍येक्षिक * सुरेखा मैड यांचे ‘माऊली..माऊली’ गीतावरील नृत्‍य ठरले लक्षवेधी * मेघना शुक्‍ल यांनी समारोपावेळी गायिले भजन. * सहभागी सर्वांची मॅग्‍नमतर्फे रक्‍तशर्करा, रक्‍तदाब तपासणी * आरोग्‍यविषयक सल्‍ला देणारे विविध स्‍टॉल्स होते उपलब्‍ध --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT