death file photo esakal
नाशिक

Nashik News : ओझर येथे HALच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Latest Marathi News : एचएएलच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने आपल्या क्वार्टर मधील पंख्याच्या सहाय्याने आपली जीवनयात्रा संपवली.

सकाळ वृत्तसेवा

ओझर : एचएएलच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने आपल्या क्वार्टर मधील पंख्याच्या सहाय्याने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ओझर टाउनशिप येथील नागरी वसाहतीतील टाईप सी थ्री २०५ येथे एचएएल कारखान्यातील इलेक्ट्रॉनिक अॅण्ड सिव्हिलचे चीफ मॅनेजर ग्यानसिंग इड्डासिंग दोडवा वय ५८ हे एकटे राहतात. (Nashik Latest Marathi News)

दि. १६ रोजी ते कंपनीत कामावर गेले तद्नंतर ते अचानक आपल्या निवासस्थानी आले. याच दरम्यान त्यांच्या उत्तर प्रदेशातील नातलगांनी त्यांना फोन केले. परंतु नातलगाच्या फोनला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्या नातलगांनी एचएएल मधील दोडवा यांच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांना दोडवा फोन उचलत नसल्याचे सांगितले.

यावेळी दोडवा यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थान गाठत दरवाजा ठोठावला. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावुन बघितले असता त्यांना दोडवा यांनी फाशी घेतल्याचे दिसताच त्यांनी एचएएलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहीती दिली. (Latest Marathi News)

एचएएल सुरक्षा अधिकाऱ्यांनी या बाबत ओझर पोलीसांना कळवले असता, ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्यानसिंग दोडवा यांचा मृतदेह ताब्यात घेत एचएएलच्या रूग्णालयात दाखल केला.

दरम्यान दोडवा यांचे नातलग उत्तर प्रदेशात रहात असुन तेथुन ते येण्यास निघाले असुन नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. दोडवा यांच्या आत्महत्येचे कारण अजुन समजलेले नाही पोलीसांनी आकस्मिक मुत्युची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT