Sharad Pawar esakal
नाशिक

Nashik Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार आज, उद्या नाशिकमध्ये!

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (ता. १९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (ता. १९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दिवंगत नेते मालोजीराव मोगल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चितेगाव फाटा (ता. निफाड) येथील कुलस्वामिनी लॉन्समध्ये सायंकाळी पाचला आयोजित या मेळाव्यास ते संबोधित करतील. (Senior leader Sharad Pawar today and tomorrow in Nashik)

रात्री नाशिकमध्ये मुक्कामी राहणार असून, सकाळी आठला काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन श्री. पवार पुण्याकडे रवाना होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे (दिंडोरी), काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (धुळे) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे हे तिन्ही खासदार निवडून आले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद वाढलेली असताना आता तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यादृष्टीने आतापासूनच तयारी केली जात असून, शरद पवारांचा निफाडला होणारा शेतकरी मेळावा हा या निवडणुकीचाच एक भाग मानला जातो. (latest marathi news)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा निफाड हा केंद्रबिंदू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात याच तालुक्यातून झाली. आता विधानसभेचे रणशिंगही निफाडमधून फुंकले जाणार आहे. शरद पवार हे शुक्रवारी अकोले (जि. अहमदनगर) येथून हेलिकॉप्टरने निफाडला येतील.

सायंकाळी पाच ते सातपर्यंत हा मेळावा सुरू राहील. त्यानंतर पवार हे नाशिकमध्ये मुक्कामी थांबतील. शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, खासदार भगरे, डॉ. बच्छाव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT