ST News sakal
नाशिक

Nashik ST Employees Strike : सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघातर्फे मागण्यांसाठी उद्या संप

ST Employees Strike : सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघातर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांना प्रलंबित मागण्यांसाठी आषाढी एकादशीला बुधवारी (ता.१७) एकदिवसीय संप पुकारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ST Employees Strike : सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघातर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांना प्रलंबित मागण्यांसाठी आषाढी एकादशीला बुधवारी (ता.१७) एकदिवसीय संप पुकारला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग, कॅशलेस मेडिकल सुविधा या मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा केला जात आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे, की २०२१ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनातील बैठकीत ९६ मागण्या मान्य केल्‍या होत्‍या. (Seva Shakti Sangharsh ST employees union to strike tomorrow for demands )

मात्र आजतागायत त्‍यांची अंमलबजावणी झाली नाही. संघटनेने राज्य सरकार व एसटी प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही मागण्या मान्य करीत नसल्याने २० डिसेंबर २०२२ पासून हिवाळी अधिवेशन नागपूरला बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या दालनात बैठक घेऊन महिन्‍याभरात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन मिळाले. प्रत्‍यक्षात तसे न झाल्‍याने संघटनेने २७ फेब्रुवारीला आत्मक्लेष आंदोलन केले. (latest marathi news)

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्‍यासोबत झालेल्‍या बैठकीतही केवळ आश्‍वासन दिले. नुकतीच वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला एक दिवसीय संप पुकारला आहे. संपाबाबत राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष अनुप खैरनार, विभागीय कार्याध्यक्ष राजाभाऊ पाठक, विभागीय सचिव बाळासाहेब आव्हाड, सी. एम. सानप, सुनील शिंदे, शरद नरोळे, मनोज चंदनशीव, प्रसाद रसाळ, मोहन गवारे, राजेश चौधरी, अनिल गोंधळी आदींनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT