Water supply Cut  esakal
नाशिक

Nashik Water Supply News : पंचवटीतील अनेक भागात पाण्यासाठी वणवण मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व खराब: पाणीपुरवठा बंद

Nashik News : पंचवटीतील मोठ्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील मुख्य व्हॉल्व खराब झाल्याने पंचवटी परिसरात गुरुवार पासून पाणीपुरवठा झाला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंचवटीतील मोठ्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील मुख्य व्हॉल्व खराब झाल्याने पंचवटी परिसरात गुरुवार (ता. २५) पासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागली. छत्रपती संभाजीनगर परिसरातील अपोलो हॉस्पिटल नजीकच्या तीन जलकुंभातून जुना व नवीन आडगाव नाका, छत्रपती संभाजीनगर रोड रोडसह गणेशवाडी परिसरात पाणीपुरवठा होतो. (several areas of Panchavati valves of aqueduct malfunctioned water supply cut off)

परंतु गुरुवारी येथील मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व नादुरूस्त झाल्याने दुपारचा व शुक्रवारी (ता. २६) सकाळचा पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागली. नांदूर नाक्यापर्यंत हीच परिस्थिती होती. अपोलो हॉस्पिटल परिसरातील तीन जलकुंभापैकी एक जलकुंभ नव्याने उभारण्यात आला.

त्यामुळे या भागातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत होता. परंतु आता तिसरा जलकुंभही कार्यान्वित झाल्याने पुढील काळात या भागातील पाणीपुरवठा सुरळीत राहील, अशी ग्वाही महापालिका पाणीपुरवठा खात्याचे अभियंता दत्तात्रेय बागूल यांनी दिली. या भागात गेल्या काही दिवसांत नव्याने इमारती उभ्या राहिल्या आहेत.

त्या ठिकाणी विद्युत मोटारींचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, विद्युत मोटारी सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी खेचले जात असल्याने ज्यांच्याकडे अशा मोटारी नाहीत, तेथील पाणीपुरवठा लगेच बंद होतो. त्यामुळे एकवेळ का होईना योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, जेणेकरून समन्यायाने सर्वांना पाणी मिळेल, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. (latest marathi news)

मोठ्या संख्येने बैठी घरे

पंचवटीतील गणेशवाडी हा भाग गावठाण परिसरात येतो. या भागात दाट लोकवस्ती असून मोठ्या संख्येने कष्टकरी समाज वास्तव्यास आहे. या भागात गुरुवारी (ता.२५) दुपारचा व शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा झालाच नाही. या भागात मोठ्या संख्येने बैठी घरे असून पाणी साठविण्यासाठी घरांमध्ये टाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकवेळ पाणीपुरवठा झाला नाही, तरी महिलांची धावपळ होते. त्यामुळे एकवेळ का होईना चांगल्या दाबाने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी आहे.

"गणेशवाडी, हिरावाडी, विजयनगर, तपोवन, जुना आडगाव नाका या भागात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाण्याच दाबही कमीच आहे. योग्य दाबाने व नियमित पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल." - किरण पानकर, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : हरीश राणा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी 'ग्रीन पार्क स्मशानभूमीत आणले

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

SCROLL FOR NEXT