Artisans preparing ladoos at Mirza Ghalib Road here
Artisans preparing ladoos at Mirza Ghalib Road here esakal
नाशिक

Ramadan Festival : शबे-ए-कदर निमित्त मालेगावला दुवापठण; मशिदींमध्ये मोठी गर्दी

जलील शेख

Ramadan Festival : रमजान पर्वातील २६ व्या रोजाला शब- ए- कदर साजरी केली जाते. येथूनच रमजानच्या खरेदीला व सणाच्या उत्साहाला सुरवात होते. शब- ए- कदरनिमित्त शहरातील पूर्व भागातील विविध मशिदींमध्ये नागरिकांनी नमाज पठण केले. रमजान पर्वात प्रत्येक मशिदीमध्ये तरावीहची नमाज होते. शबे- ए- कदरनिमित्त विविध मशिदींमध्ये रात्री उशिरापर्यंत दुवा पठण करण्यात आले. (nashik Shab e Qadr is celebrated on 26th day of Ramadan in district marathi news)

मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही दिवसांवर रमजान ईदचा सण आहे. शनिवारी रात्री शब-ए-कदरची तयारी येथील मशिदींमध्ये सुरु होती. मशिदींमध्ये विशेष स्वच्छता करण्यात आली. रात्रभर नमाज व दुवापठण करण्यात आले. मशिदींमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. शब-ए- कदरनिमित्त शहरातील मशिदींमध्ये कुराण पठण झाले. तरावीहच्या नमाजनंतर सामुहिक दुवापठण करण्यात आले.

दुवा संपल्यानंतर प्रत्येकाला शिरणी वाटप करण्यात आली. येथील प्रत्येक मशिदीमध्ये ऐतेकाफ केले जात आहे. रमजानच्या शेवटच्या आठवड्यात मोहल्ल्यातील मशिदीमध्ये एक व्यक्ती एक दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत मशिदीमध्ये थांबतात. त्याच ठिकाणी जेवण, नमाज पठण करतात. ईदचे चंद्रदर्शन झाल्यानंतर ऐतेकाफ संपतो. या ऐतेकाफमध्ये बसलेली व्यक्ती सर्व मानव जातीसाठी दुवा करते.

शब-ए-कदरनिमित्त शहरात रात्रभर गजबज होती. चहा, कापड बाजार, खाद्यपदार्थ, हॉटेल, उपाहारगृह यासह विविध दुकाने मध्यरात्री उशिरापर्यंत सुरु होती. यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. व्यावसायिकांनी सकाळपासूनच खाद्यपदार्थ दुकानात दुप्पटीने माल भरून ठेवला होता. पहाटे फजरच्या नमाजपर्यंत बहुतांशी बाजारपेठा सुरु होत्या.(latest marathi news)

लाडू व्यवसाय तेजीत

शहरात रमजान महिन्याच्या १५ व्या रोजापासून लाडू तयार केले जातात. येथे लाडू तयार करणारी ४० ते ५० दुकाने आहेत. यावर्षी शब-ए-कदरला मोठ्या प्रमाणात लाडूची विक्री झाली. एका दुकानावर सुमारे ४०० ते ५०० किलो लाडूची विक्री झाल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. सध्या लाडू १४० रुपये किलोने विकला जात आहे. शब- ए - कदरच्या रात्री दुवा व नमाजपठण झाले.

मिठाई बाजार तेजीत होता. बुंदीच्या लाडूला सर्वाधिक मागणी होती. दुवा पठणासाठी आलेल्यांना लाडू, नानकटाई, रोट आदी पदार्थांचे वाटप केले जात होते. शहरात लाखो रुपयांच्या लाडूची विक्री झाली. प्रत्येक मशिदीत शब-ए-कदरचा चंदा नागरिकांनी द्यावा यासाठी इमाम आवाहन करत होते. बहुतांशी मशिदीमध्ये मगरीबच्या नमाजपर्यंत चंदा गोळा करण्याचे काम केले जात होते.

''शब- ए- कदरच्या रात्री पवित्र कुराण अवतरले होते. त्यामुळे रमजान महिन्यात महिनाभर कुराण पठण करून तरावीहची नमाज होते. रमजान पर्वात शब-ए-कदरला विशेष महत्त्व आहे.''- मौलाना साजिद खान नदवी इमाम, हजरत बिलाल मशीद

''यंदा प्रथमच एक हजार किलो लाडूचे मागणी आली आहे. कारागीर दोन दिवसापासून दिवसाला शंभर किलो लाडू तयार करीत आहेत. आणखी दोन ते तीन दिवस लाडूंना मागणी राहील.''- हाशीम अन्सारी, लाडू विक्रेता, मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT