Nashik News : कांदा, द्राक्ष, डाळिंब व फळ पिकांची केंद्र शासनाने दयनीय अवस्था केली असून भाजपा शासनाला शेतकऱ्याची अजिबात चिंता नाही. शेती उत्पादनाला हमीभाव व उत्पादित मालाचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी केंद्र शासनाची आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. (Sharad Pawar criticism of onion issue with agricultural produce to bjp)
कांदा निर्यातबंदी व अवाजवी निर्यात शुल्क लादून हे केंद्रातील असंवेदनशील भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. येथील पाठक मैदानावर धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत श्री. पवार बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, माजी आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, यशवंत गोसावी, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, आमदार असिफ शेख, जयंत दिंडे, गजेंद्र चव्हाण, प्रा. नीलेश कराळे, राजेंद्र भोसले आदी प्रमुख पाहुणे होते.
श्री. पवार म्हणाले, मी केंद्रात कृषी मंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून भाजपच्या खासदारांनी लोकसभेत भाव कमी करण्याची मागणी करीत आंदोलन छेडले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्याला एखाद्या वर्षी दोन पैसे जास्त मिळाले तर तुमचं बिघडलं कुठं? असा प्रतिप्रश्न करीत मी त्यांची बोलती बंद केली. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणायची असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. (latest marathi news)
उमेदवार डॉ. बच्छाव म्हणाल्या, गेल्या दहा वर्षात धुळे मतदारसंघात विकासकामांचा अनुशेष वाढला आहे. केंद्राने शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, नोकरवर्ग यांना दिलेले एकही वचन पाळल नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे अमिष दाखवून त्याची फसवणूक केली. विविध तपास यंत्रणांचा धाक दाखवून पक्ष पूर्ण पलीकडे काही काम केले नाही. त्यामुळे परिवर्तनासाठी संधी द्या.
जयंत पाटील यांनी शेतकरी देशोधडीला लागला असून चुकीच्या धोरणामुळे भरडला जात आहे. शेतकऱ्यांमध्ये शासनविरोधी तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माधर्मात तेढ निर्माण करून प्रचारसभांमध्ये मर्यादांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे जनतेने ही निवडणूक आता स्वतःकडे घेतली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, निवडणुका पुढे सरकू लागल्या तशी मोदींच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. महाराष्ट्रातील सभांमध्ये हास्यास्पद व चुकीची वक्तव्य करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. डॉ. सुभाष भामरे यांच्याविषयी जनतेत रोष असल्याने ते सपशेल फेल झाले आहेत.
माजी खासदार बापू चौरे, डी.एस. अहिरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल पाटील, प्रल्हाद पाटील, नाशिक जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शिवसेना उबाठा गटाचे नेते लालचंद सोनवणे, अरविंद सोनवणे, विजय वाघ, तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत सोनवणे, शहराध्यक्ष रवींद्र सोनवणे.
माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, दत्तू सोनवणे, मनोहर बिरारी, बाजार समितीचे उपसभापती संजय बिरारी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील, यशवंत अहिरे, प्रकाश देवरे, साखरचंद कांकरिया, राहुल पाटील, पिंपळदरचे सरपंच संजय पवार, संजय सूर्यवंशी, शमा दंडगव्हाळ, वंदना भामरे, अॅड. रेखा शिंदे आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व मित्र पक्षांचे शेकडो कार्यकर्ते शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
बागलाण तालुक्यातील युवा शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे आणि प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार खैरनार यांनी कांद्यावर शरद पवारांचे चित्र रेखाटून ते श्री.पवार यांना व्यासपीठावर भेट दिले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये कैद केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.