Sharad Pawar esakal
नाशिक

Sharad Pawar Nashik Daura : शरद पवार आजपासून नाशिकमध्ये; लोकसभेचा कौल जाणून घेण्यासाठी 2 दिवस पक्ष पदाधिकारी

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद‍चंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार बुधवार (ता. १३)पासून दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar Nashik Daura : लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद‍चंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार बुधवार (ता. १३)पासून दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. निफाड येथील दुगाव रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रांगणात सायंकाळी सहाला त्यांची सभा होणार आहे. (nashik Sharad Pawar daura from today marathi news)

गुरुवारी (ता. १४) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत चांदवडला महाविकास आघाडीच्या मेळाव्यालाही शरद पवार उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ राहुल गांधीही नाशिकमध्ये येत असल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

दोनदिवसीय दौऱ्यात शरद पवारांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. जास्तीत जास्त वेळ चर्चा करण्यासाठी राखीव ठेवल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा कल त्यांना जाणून घ्यायचा आहे. बुधवारी सकाळी साडेदहाला फ्रावशी इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे.

त्यानंतर हॉटेल एमराल्ड पार्क येथे दोन ते अडीच तास पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते जगदीश गोडसे यांच्या घरी खासगी कार्यक्रमानिमित्त ते सदिच्छा भेट देतील आणि त्यानंतर निफाड तालुक्यातील सभेसाठी रवाना होणार आहेत. (latest marathi news)

उपबाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. यासभेपूर्वी साधारणतः दीड ते दोन तास ते येथील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिंडोरी लोकसभेचा कौल जाणून घेतील. रात्री पुन्हा नाशिकमधील हॉटेल एमराल्ड पार्क येथे मुक्कामासाठी ते येणार आहेत.

या वेळीही स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आल्याचे समजते. शरद पवार यांच्या दौऱ्यासाठी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, दत्तात्रय पाटील, शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

गुरुवारी महाविकास आघाडीचा मेळावा

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी गुरुवारी (ता. १४) नाशिकमध्ये येत आहेत. चांदवडला महाविकास आघाडीचा मेळावा होणार असून, या मेळाव्यास शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मालेगाव येथील दरेगाव चौफुलीवर दुपारी तीनला आगमन होईल. सुपर मार्केट परिसरात चौकसभा होऊन त्यानंतर दोन तास ‘रोड शो’ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT