Former MLA Yogesh Gholap while felicitating Nationalist Congress Party President Sharad Pawar. esakal
नाशिक

Nashik Sharad Pawar : पवारांची गुगली अन इच्छुकांची भंबेरी! निफाडबाबत संभ्रम तयार

Nashik News : लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने आत्मविश्‍वास उंचावलेल्या महाविकास आघाडीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विशेषत: शरद पवारांनी निफाडमध्ये शेतकरी मेळाव्यातून शेतकऱ्यांना पुन्हा साद घातली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (कै.) मालोजीराव मोगल यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी निफाडला झालेल्या शेतकरी मेळाव्यात देवळाली विधानसभेचे माजी आमदार योगेश घोलप व येवला मतदारसंघातून इच्छुक असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या संचालिका व भाजपच्या नेत्या अमृता पवार यांनी शरद पवारांचा सत्कार केला. (Nashik Sharad Pawar)

घोलप व पवारांनी अनपेक्षितरीत्या सत्कार करून उपस्थितांना धक्का तर दिलाच. शिवाय, त्यांच्याकडून कानगोष्टीही ऐकून घेतल्या. परंतु, पवार यांनी टाकलेल्या गुगलीने येवला व देवळालीच्या इच्छुकांची भंबेरी उडाली; तर निफाडच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग निफाडमधूनच फुंकले होते.

धुळे, दिंडोरी व नाशिक या तिन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने जिल्ह्याने पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. लोकसभा निवडणुकीत निर्भेळ यश मिळाल्याने आत्मविश्‍वास उंचावलेल्या महाविकास आघाडीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विशेषत: शरद पवारांनी निफाडमध्ये शेतकरी मेळाव्यातून शेतकऱ्यांना पुन्हा साद घातली.

त्यांनी भाषणातून राजेंद्र मोगल यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे माजी आमदार अनिल कदम व बाळासाहेब क्षीरसागर हे संभ्रमावस्थेत पडले आहेत. कदम यांचे प्रत्येक पाऊल महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या दिशेने पडत असताना मध्येच ‘गतिरोधक’ लागल्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. येवल्यात मंत्री छगन भुजबळांनी साथ सोडल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर कुणाल दराडे यांनी दावा केला होता. (latest marathi news)

परंतु, विधान परिषद निवडणुकीत त्यांना पक्षविरोधी काम करावे लागले. याचा योग्यरीत्या फायदा उठवत अमृता पवारांनी थेट व्यासपीठावरच शरद पवार यांचा सत्कार करून आपणही इच्छुकांच्या यादीत समाविष्ट असल्याचे दाखवून दिले. देवळाली, निफाड व येवला अशा तिन्ही मतदारसंघांच्या हद्दीवर हा कार्यक्रम होता.

त्यामुळे देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप यांनीही पवारांना ‘टोपी’ घातली. फक्त टोपीच आणली का, चिपळ्या नाही आणल्या, असा प्रतिप्रश्‍न पवारांनी केल्यावर प्रत्युत्तर देण्यापेक्षा घोलपांनी या सूचक विधानाला स्मित हास्य करून उत्तर दिले. पण, दोघांमधील कानगोष्टी काही बाहेर आल्या नाहीत, हे मात्र निश्‍चित!

एका मेळाव्यातून तीन बाण

निफाडमधील शेतकरी मेळाव्यातून शरद पवारांनी तीन बाण सोडल्याचे मानले जात आहे. त्यांनी भाषणातून राजेंद्र मोगल यांना साथ देण्याचे आवाहन करीत शेतकरी बांधवांना अर्थात मतदारांना साद घातली. व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांना स्थान दिले.

तिसरा बाण म्हणजे, ‘मविप्र’ समाज शिक्षण संस्थेचे सभापती तथा लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची पाठ थोपटत त्यांनाही आशीर्वाद दिला. पवारांच्या भाषणानंतर खासदार राजाभाऊ वाजे व अनिल कदम यांचे चेहरे प्रश्‍नार्थक झाल्याचे दिसून आले. पण, ‘पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणत कदमांनी जाता-जाता पवारांची भेट घेतली.

"हा कुठल्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता. तालुक्याचे ज्येष्ठ नेते (कै.) मालोजीराव मोगल यांच्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा हा कार्यक्रम होता. यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सत्कार केला, यात राजकीय हेतू नाही. परंतु, पक्षाने संधी दिली तर त्याचा निश्‍चितपणे भविष्यात विचार केला जाईल." - अमृता पवार, भाजप नेत्या

"ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सत्कार करीत असताना त्यांनी चिपळ्या नाही आणल्या का? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर मी काहीच प्रत्युत्तर दिले नाही. त्यांनी सूचकपणे विधान केले, हे मात्र निश्‍चित." - योगेश घोलप, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT