Sharad Pawar esakal
नाशिक

Sharad Pawar Nashik Daura : नाशिकची जागा ठाकरे गटाला, तर दिंडोरीची पवार गटाकडे; शरद पवारांकडून स्पष्टीकरण

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) नाशिक लोकसभेसाठी आग्रह केल्याने महाविकास आघाडीचा तिढा निर्माण झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar Nashik Daura : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) नाशिक लोकसभेसाठी आग्रह केल्याने महाविकास आघाडीचा तिढा निर्माण झाला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) लढविणार आहे. (nashik Sharad Pawar statement marathi news)

तसेच दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लढविणार असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील जागेचा तिढा सोडविला. शरद पवार यांनी नाशिक येथे बुधवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीस सामोरे जात असताना नाशिक लोकसभा मतदारसंघावर सुरवातीला काँग्रेसने, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) दावा केला होता.

पक्षाच्या विविध बैठकांमधून ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणीदेखील झाली होती. त्यासाठी इच्छुकांनी मुंबईदरबारी शिष्टमंडळ घेऊन भेटी घेतल्या होत्या. ही जागा शिवसेना (ठाकरे गट) लढविणार असल्याचे यापूर्वीच नेते संजय राऊत यांनी जाहीर केले होते. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू होती. (latest marathi news)

मात्र, पवार यांनी नाशिक लोकसभा शिवसेना (ठाकरे गट) लढविणार असल्याचे स्पष्ट केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही जागा लढविण्याची मागणी केली होती. संघटनेत काम करताना निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली जाते. मात्र, ही जागा शिवसेना (ठाकरे गट) लढेल आम्ही त्यांच्या सोबत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे पवार यांनी सांगितले. दिंडोरीच्या जागेसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्याची पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. याबाबत महाविकास आघाडी अतंर्गत त्यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये लढत

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच पुन्हा उमेदवार असतील, अशी घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. यापाठोपाठ शरद पवार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना (ठाकरे गट) लढविणार असल्याचे जाहीर केल्याने आता या मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे शिवसेनेत लढत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT