nashik Sharad Pawar To hold meeting on 8th july nashik news esakal
नाशिक

Nashik Sharad Pawar : अखेर तारीख ठरली! भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा या तारखेला एल्गार...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अतिशय विश्वासू असलेले येथील आमदार छगन भुजबळ यांनीच बंड करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात सहभागी झाल्याने त्यांच्या मतदारसंघातूनच पक्ष बांधणीचा एल्गार ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पुकारला आहे. (nashik Sharad Pawar To hold meeting on 8th july nashik news)

यापूर्वी प्रत्येक वेळेस शरद पवारांनी भुजबळ यांची बाजू घेत पक्षात त्यांना साथ दिली,तरीही ते पवारांना सोडून गेल्याने भुजबळांचे येथील विरोधक व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी आज सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिंदे व पवारांचे अतिशय जुने नाते आहे किंबहुना पवारांनी राज्य कापूस पणन महासंघाचे अध्यक्षपद देखील शिंदे यांच्या पत्नी उषाताई शिंदे यांना दिले होते.

हे जुने नाते वृद्धिंगत करत आज शिंदे यांनी जाहीर पाठिंबा देऊन मुंबईत पवारांची भेट घेतली. यावेळी आठ तारखेला दुपारी तीन वाजता येवल्यात सभा घेण्याचे पवार साहेबांनी मान्य केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT