While giving a statement to Deputy Commissioner of Police Monika Raut, District Head Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : प्रचार संपला, विरोधाची धग कायम!

Lok Sabha Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला, मात्र शिवसेना  उबाठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत. (Nashik Lok Sabha Election)

संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यापासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रोखण्याचीही कारवाई रद्द करण्याचे निवेदन पक्षाने पोलिस प्रशासनाला दिले आहे. 
शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षातील शह-काटशहाचे राजकारण प्रचार संपल्यानंतर अधिक तीव्र होताना यानिमित्त दिसत आहे.

पोलिसांनी शिवसेना ‘उबाठा’च्या सिन्नर विधानसभा उपजिल्हाप्रमुख राजेंद्र ऊर्फ कन्नू ताजणे, देवळाली विधानसभाप्रमुख योगेश वामनराव भोर, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल अंबादास ताजनपुरे, माजी नगरसेवक अंबादास दामू ताजनपुरे यांना हद्दपारीच्या  नोटीसा बजावल्या.

या नोटिसा म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असून लोकशाहीचा अपमान असल्याचे निवेदन जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, दत्ता गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी  शहर परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांना  दिले आहे. (latest marathi news) 

यंत्रणेच्या गैरवापराचा आरोप

आगामी तीन दिवसांसाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिलेल्या हद्दपारीच्या  नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.यातून सत्ताधारी राजकीय पक्षाकडून पोलिस यंत्रणेचा वापर होत असल्याचा आरोप शहरातील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात कोणतीही कारवाई पोलिसांकडून होत असल्याचेही जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी म्हटले आहे. 

सुधाकर बडगुजरांना अंशत: दिलासा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खंदेसमर्थक व जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना शहर पोलिस आयुक्तालयाने बजावलेल्या तडीपारीच्या नोटिशी प्रकरणी अंशत: दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

त्यामुळे ऐन निवडणुकीत तडीपारीच्या कारवाईपासून त्यांना दिलासा मिळाला आहे. सुधाकर बडगुजर यांना २०१४ मधील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी उपायुक्त मोनिका राऊत यांनी चौकशी करून हद्दपार संदर्भातील नोटीस ९ मे रोजी बजावली होती.

उत्तरासाठी १० दिवसांची मुदत पोलिस प्रशासनाने दिली होती. मात्र, उच्च न्यायालयातून कागदपत्रे मिळालेली नसल्याने मुदतवाढीची मागणी बडगुजर यांनी केली. त्यानुसार २७ मेपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुभा पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT