A built up empire of dirt in the river Sivan esakal
नाशिक

Nashik News : लासलगावच्या शिवनदीचा श्‍वास गुदमरला! घाणीच्या साम्राज्यमुळे नदी बनली अक्षरश: कचराकुंडी

Latest Nashik News : एकेकाळी खळखळून वाहणारी ही शिवनदी मात्र घाणीच्या साम्राज्यामुळे अक्षरश: कचराकुंडी झाली आहे.

अरुण खांगळ

लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावची शिवनदीचा नागरिक, प्रशासनाच्या बेजाबदारपणामुळे श्‍वास कोंडला गेला आहे. एकेकाळी खळखळून वाहणारी ही शिवनदी मात्र घाणीच्या साम्राज्यामुळे अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. (Shivanadi of Lasalgaon choked river became garbage dump)

निफाड तालुक्यातील लासलगाव, ब्राह्मणगाव, निमगाव वाकडा या गावांच्या शिवेवरुन शिवनदी वाहते. मात्र, नदीत वाढलेली मोठ्या प्रमाणात जलपर्णी, हॉटेल व्यवसायिकांच्या ओला कचरा, भाजीपाला मार्केट कचरा, मटण मार्केटचे टाकाऊ कचरा, मोठ्या प्रमाणात प्लास्टिक यामुळे शिवनदीचा प्रवाह पूर्णपणे थांबला गेला आहे.

त्यामुळे ही नदी कि नाला अशीच स्थिती सध्या नदीची झाली असून आता फक्त शिवनदीमध्ये काठावरील गावांचे सांडपाणी साठलेले दिसत आहे. यामुळे गावातील नागरिकांना आरोग्याचा मोठा धोका देखील आहे. सतत परिसरात सतत दुर्गंधी देखील असते.

प्रवाह बदलण्याची भीती

शास्त्रीनगर बंधारा ते निमगाव वाकडा या मुख्य भागात नदीपात्रात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असल्याने नदीची रुंदी कमी झालेली दिसत असून प्रवाहाची दिशा पण बदलत चाललेली आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास शिवनदीचे रूपांतर एक साध्या गटरीत होण्यास वेळ लागणार नसल्याने नागरिकांनाच आता पुढाकार घेवून शिवनदीला कचराकुंडी होण्यापासून वाचविण्याची गरज आहे.

अभियानाला ब्रेक

चालू हंगामात परतीचा मान्सून चांगला बरसल्यामुळे परिसरातील गावांना नदीला पुराचे पाणी येईल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. तत्कालीन सरपंच नानासाहेब पाटील यांनी शिवनदी स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यांना थोड्याफार प्रमाणात यशही आले. पण पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ स्थितीमुळे पुन्हा परिस्थिती जैसे थी झाली आहे. (latest marathi news)

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराची गरज

शिवनदीचा कायापालट करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य नदी संवर्धन अंतर्गत सुशोभीकरण प्रस्ताव पाठवल्यानंतर नदीच्या सुशोभीकरणासाठी १३ कोटी १२ लाख २३ हजार ८७८ रुपयांचा निधी शासन स्तरावर मंजूर झाला. त्यानंतर जिल्हा परिषद परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल व लासलगावचे माजी सरपंच जयदत्त होळकर व ग्रामपंचायत सदस्य यांनी या कामी प्रयत्न करून सदर योजनेवर प्रशासकीय मान्यता मिळविली.

आता निधी प्राप्त करुन काम सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराची गरज आहे. नदीच्या सुशोभीकरणासाठी २० टक्के रक्कम (दोन कोटी ६२ लाख ४४ हजार) ही ग्रामपंचायतीने भरल्यानंतर या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.

या कामांचा समावेश

शिवनदी सुशोभीकरण कामात लासलगाव शास्त्रीनगर बंधारा ते निमगाव वाकडा देवी मंदिर या परिसरातील शिवनेरी काठचा परिसर सुशोभीकरण. यात प्रामुख्याने घाट दुरुस्ती, काठावर असलेला कचरा डेपोला पाच फूट संरक्षण भिंत, दशक्रिया विधी शेड सुशोभीकरण, घनकचरा खत निर्मिती, सांडपाणी व मलनिस्सारण, भूमिगत गटारी, नदीकाठी जॉगिंग ट्रॅक्स, १ हजार वृक्षांची लागवड, सोलर लाईट बसवणे अशी अनेक कामे यात अंतर्भूत केली जाणार आहे.

"सध्याचे शिव नदीची स्थिती अत्यंत दयनीय आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण असल्यामुळे पाणी वाहत नाही. त्यामुळे साठलेल्या पाण्याची दुर्गंधी येते. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात दलदल झाली आहे."- धनंजय वाकचौरे,पिंपळगाव नजीक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT