thorny bushes that fell on the drain near Shiva Road in Soygaon esakal
नाशिक

Nashik News : शिवरस्त्यावरील खचलेली मोरी जीवघेणी! दुरुस्ती न केल्यास वाहतूक ठप्प होणार

Nashik News : कलेक्टरपट्टा भागातील शिवरस्त्यालगत नाल्यावरील मोरी खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.

योगेश बच्छाव

सोयगाव : कलेक्टरपट्टा भागातील शिवरस्त्यालगत नाल्यावरील मोरी खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याबरोबरच वाहतूक बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवररस्त्यालगत अयोध्यानगर भागातून जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर नाल्यावरील मोरी अवजड वाहनांमुळे खचली आहे. (condition of Shivar road is dangerous)

त्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी तसेच नागरिकांना ये जा करण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. रस्ता बंद झाल्यास शाळेच्या मुलांसह नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. नाल्यावरील बांधकाम पडल्याने यावर काटेरी झुडपे टाकण्यात आल्याने ते धोकादायक बनले आहेत.

नाल्यावरील बांधकाम खचल्याने ये जा करताना जीव मुठीत घेत मोठी कसरत करावी लागते. या नाल्यांमध्ये कचरा पडल्याने पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पानवेल व कचऱ्यामुळे या नाल्यांमध्ये पाणी साचून राहत आहे. या नाल्याच्या जवळच शाळा आहेत.

बहुतांश विद्यार्थी याच मार्गाने शाळेला ये- जा करीत असतात. त्यातील अनेक विद्यार्थी हे सायकलवर ये-जा करीत असतात. त्यामुळे अनावधानाने एखादा विद्यार्थी या नाल्यांमध्ये पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत स्थानिक नागरिक व पालकांनी संबंधित विभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. (latest marathi news)

सटाणा नाका रस्ता अर्धाच

सटाणा नाका ते शिवरस्ता या रस्त्याचे कामही अर्धवटच झाले आहे. रस्त्यावरून शालेय मुलं, व्यावसायिक दररोज ये -जा करतात पावसामुळे रस्त्यात मोठे खड्डे झाले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

"या रस्त्याने वाहनचालक व शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. रस्त्यालगत असलेल्या नाल्यावर बनलेले बांधकाम पडल्याने नाला धोकादायक बनला आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा व पानवेली यामुळे दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे." - निंबा शेलार, पालक, अयोध्यानगर

"या नाल्यावरील मोरीच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन त्वरित नाल्याची स्वच्छता व नाला बंदिस्त करावा तसेच शिवरस्ता दुरुस्त करावा." - रमेश बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते, सोयगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT