Nashik Lok Sabha Code Of Conduct  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Code Of Conduct : आचारसंहितेत अडकली टंचाई आढावा बैठक

Nashik News : राज्यातील भीषण दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी होत असताना अद्याप राज्य सरकारला त्यात यश आलेले नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील भीषण दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी होत असताना अद्याप राज्य सरकारला त्यात यश आलेले नाही. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. ३१) बोलावलेली टंचाई आढावा बैठक रद्द केली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ३९० टँकरने एक हजार २९७ गावे व वाड्यांवरील सात लाख लोकांना पाणी पुरवले जात आहे. (Shortage review meeting stuck in code of conduct)

सिन्नर, येवला व नांदगाव या भागात चाराटंचाई असल्यामुळे चारा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात आता खरीप हंगाम डोळ्यासमोर असल्यामुळे खर्च नेमका कुठे करावा, असा पेच शेतकऱ्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ४ जूनपर्यंत लागू राहील.

त्यात शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाल्यामुळे जुलैपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे दिसते. टंचाईच्या विदारक स्थितीला तोंड देताना शासन काहीतरी उपाययोजना करेल, अशी आशा नागरिकांना होती. (latest marathi news)

या उपाययोजनांसाठी पालकमंत्री भुसेंनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चारा, पाणी व खरीप हंगाम आढावा बैठक बोलावली होती.

परंतु, आचारसंहितेमुळे ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुनमास’ अशी अवस्था झाली आहे. प्रशासन करत असलेल्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने पाऊस केव्हा पडतो, याचीच वाट लोक आता बघू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

विचित्रच! जाहिरातीचं शूटींग अन् खांदा निखळला; स्टार खेळाडू IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, वाढली डोकेदुखी

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Numerology: मूलांक १ असलेल्या लोकांवर का असते श्री गणेशांची कृपा?गणपती बाप्पा अन् अंक १ चा काय आहे संबंध?

SCROLL FOR NEXT