Kalika Devi mandir esakal
नाशिक

Nashik Navratri 2024 : श्री कालिकादेवी नवरात्रोत्सव दुसऱ्या माळेला दर्शनासाठी गर्दी! पेड दर्शनाविरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

Latest Navratri 2024 News : सकाळच्या महाआरतीत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान कालिका देवीच्या सशुल्क (पेड) दर्शनाविरोधात सामाजित कार्यकर्ते गजू घोडके यांनी आंदोलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Navratri 2024 : श्री कालिकादेवी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी हिरवा साड्या परिधान करून मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्ताने आयोजित रक्तदान, रक्तातील साखरेची तपासणी, रक्तदाब शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.

सकाळच्या महाआरतीत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान कालिका देवीच्या सशुल्क (पेड) दर्शनाविरोधात सामाजित कार्यकर्ते गजू घोडके यांनी आंदोलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. (Shree Kalikadevi Navratri festival 2024)

श्री कालिका देवी नवरात्रोत्सवास गुरुवारपासून (ता.३) प्रारंभ झाला. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या हस्ते महाआरती झाली. शुक्रवार (ता.४) असल्याने हिरव्या साड्या परिधान करून आलेल्या महिलांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती.

दरम्यान शनिवार (ता.५) असल्याने सातपूर, अंबडमधील कंपन्यात कार्यरत असलेले सुटीचे औचित्य साधत दर्शनासाठी गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी येथे दाखल झालेल्या विविध खेळणीला अद्याप प्रतिसाद नसल्याचे फेरफटका मारला असता दिसून आले.

देवस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदानासह रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण आदी तपासणी शिबिर सुरू आहे. जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर तर आडगावच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयातर्फे तपासणी शिबिर सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे विश्‍वस्तांनी सांगितले. दुपारपर्यंत चाळीस बाटल्या रक्तसंकलन झाले होते.

दरम्यान सांडव्यावरील देवी मंदिरासह जुन्या नाशकातील साक्षी गणेश मंदिर परिसरातील प्राचीन श्री भद्रकाली देवी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. नवरात्रोत्सवानिमित्त दोन्ही देवस्थानतर्फे दसऱ्यापर्यंत भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. (latest marathi news)

पेड दर्शन ही गरिबांची थट्टा : घोडके

दरम्यान श्री कालिका देवी संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पेड दर्शनाचे नियोजन सुरू आहे. त्याविरोधात अखिल भारतीय संत कमिटीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक गजू घोडके यांनी आक्रमक होत विरोध केला आहे. कालिका माता ग्रामदेवता असून गरीब लोक येथे मोठ्या संख्येने देवीचे भक्त आहेत.

ते पहाटेपासून दर्शनसाठी रांगा लावतात. धर्माच्या नावाने ही लूट आहे. शंभर रुपये घेणारे श्रीमंतांना त्वरित दर्शन तर गरिबांना तासनतास रांगेत उभे करण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. हा प्रकार न थांबल्यास याठिकाणी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT