A beautiful temple of Sri Tulja Bhavani Mata was built on Jaibhavani Road. esakal
नाशिक

Nashik Tulja Bhawani Temple : जयभवानी रोडवर साकारले श्री तुळजा भवानी मातेचे मंदिर

Tulja Bhawani Temple : जयभवानी रोडवर श्री तुळजा भवानी मातेचे मंदिर साकारले असून मूर्तीची १५ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध षष्टीला विधिवत प्राणप्रतिष्ठा, मंदिराचा कलशारोहण सोहळा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tulja Bhawani Temple : जयभवानी रोडवर श्री तुळजा भवानी मातेचे मंदिर साकारले असून मूर्तीची १५ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध षष्टीला विधिवत प्राणप्रतिष्ठा, मंदिराचा कलशारोहण सोहळा होणार आहे. यासाठी तयारी सुरु असल्याची माहिती देवस्थान अध्यक्ष अॅड. शिवाजी सहाणे यांनी दिली. नाशिक रोड, जय भवानी रोडवरील ध्येयनिष्ठ युवकांनी एखादा संकल्प सोडल्यास त्यात कितीही अडथळे आले तरी न डगमगता, हिंमत न हारता ते हातचा संकल्प तडीस नेतातच. (nashik Shree Tulja Bhavani Mata Temple constructed on Jai Bhavani Road inauguration on 15 april marathi news)

हा संकल्प पूर्णत्वास जाताच समाजहितासाठी एक अनोखी निर्मिती आकारास येते. याची प्रचिती या उभारण्यात आलेल्या या सुंदर कलाकुसरीच्या श्री तुळजा भवानी मातेचे भव्य मंदिर बघून भाविकांना येत आहे. स्थानिक युवकांनी २००९ मध्ये या मंदिराच्या उभारणीचा संकल्प सोडल्यानंतर कोरोना काळाचा अपवाद सोडला तर गेली सलग १२ वर्षे १२० राजस्थानी कारागिरांचे हात या मंदिराच्या उभारणीसाठी अहोरात्र राबत होते.

विशेष म्हणजे हे संपूर्ण मंदिर लोकसहभागातून आकारास आले असून या मंदिरात तमिळनाडूतील महाबलीपूरम येथे काळ्या पाषाणात घडविलेल्या तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा, मंदिराचा कलशारोहण होणार आहे. जयभवानी रोडवरील या भव्य मंदिरातील गाभाऱ्यात जमिनी खाली पंचवीस फुटावर श्री तुळजा भवानी मातेचे शस्त्र विधिवत ठेवले असून या शस्त्रावरच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

प्रतिष्ठापनेवेळी मूर्ती खालील शस्त्रावर भाविकांना गुप्तदान करण्याची संधी मिळणार आहे. यानिमित्ताने ९ ते १५ एप्रिल या कालावधीत विविध ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, यज्ञविधी, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्थानिक मळेकऱ्यांनी उपनगर येथे आजच्या अश्विन सोसायटी परिसरात तुळजा भवानी देवीची दोन शिळांच्या रूपातील मूर्तीची स्थापना केली होती.  (latest marathi news)

या देवीला आजही चिंधा देवी म्हणून ओळखले जाते. म्हणून या रस्त्याचे नाव जयभवानी रोड असे पडले. भवानी देवी ही मराठी माणसांची कुलदैवत म्हणून या भागात तुळजाभवानी देवीचे भव्य मंदिर असावे, अशी भाविकांची इच्छा होती. २००९ मध्ये या मंदिराच्या उभारणीचा संकल्प सोडला. लोकसहभागातून अखेर चौदा वर्षांनंतर हा संकल्प साकार झाला.

असे झाले मंदिराचे काम

हेमाडपंथी प्रकारातील या तुळजा भवानी मंदिरासाठी अयोध्येत साकारलेल्या श्रीराम मंदिराप्रमाणेच राजस्थानातील २२१० टन इतका बन्सी पहाडपूर दगडाचा वापर झाला. ३२०० चौरस मीटर जागेवर उभारलेल्या या मंदिराची उंची ७५ मीटर इतकी असून एकूण सहा दरवाजे आहेत. या मंदिरासाठी स्टील वापरले नसून तांब्याच्या पट्टीचा वापर केला आहे.

या मंदिराच्या चार दिशांना महादेव, साती आसरा, हनुमान आणि भैरवनाथ आदी मंदिरेही उभारली आहेत. पूर्वीच्या मळेकऱ्यांच्या ज्या जागेवर साती आसरा मातेचे मंदिर होते. तिथेच हे नवीन मंदिर आकारास आले आहे. संपूर्ण मंदिर घडीव दगडातून उभारले असून आधुनिक वास्तुशास्त्राचा हे मंदिर एक उत्तम नमुना ठरले आहे.

हे मंदिर हे तुळजापूरनंतर तुळजाभवानी मातेचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर असणार आहे. या मंदिरामध्ये तुळजापूरच्या मंदिराप्रमाणे तुळजा भवानी मातेची मूर्ती बसविणार असून या धार्मिक सोहळ्याची विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT