Shantigiri Maharaj Siddheshwarananda Guruswami Someshwarananda esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : सिध्देश्‍वरानंद सरस्वतींकडे पावणे तीन लाखांचे घड्याळ! महाराजांकडे 24 लाख रुपये रोख

Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज यांच्यानंतर त्र्यंबकेश्‍वरचे सिध्देश्‍वरानंद गुरुस्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वतींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज यांच्यानंतर त्र्यंबकेश्‍वरचे सिध्देश्‍वरानंद गुरुस्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वतींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे सोन्याचा मुलामा असलेले पावणे तीन लाखांचे घड्याळ असून तब्बल दीड कोटींची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाला दिली आहे. ( Siddheshwaranand Guruswami Someshwaranand Saraswati of Trimbakeshwar filed his independent candidature )

उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी (मंगळवारी ता.३०) नाशिक लोकसभेसाठी तीन उमेदवारांनी अर्ज सादर केले. यात सिध्देश्‍वरानंद सरस्वती व जितेंद्र नरेश भाभे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. कमलाकर बाळासाहेब गायकवाड यांनी दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दलातर्फे आपला अर्ज सादर केला. यात सिध्देश्‍वरानंद महाराजांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या संपत्तीचे विवरण सादर केले.

त्यानुसार महाराजांकडे २४ लाख ८१ हजारांची रोख रक्कम असून, पावणे दोन लाखांच्या ठेवी विविध बँकांमध्ये त्यांच्या नावे आहेत. ४५ हजारांचे शेअर्स महाराजांनी खरेदी केले आहेत. टेम्पो, जेसीबी, बस आदी प्रकरांची २२ लाखांची वाहने त्यांच्याकडे आहेत. एवढी सगळी संपत्ती असताना महाराजांवर ९५ लाख ९५ हजार रुपयांचे कर्जही डोक्यावर आहे. विशेष म्हणजे, सिध्देश्‍वरानंद महाराजांकडे साडेचार लाखांचे (५५ ग्रॅम) सोने असून, पावणे तीन लाखाचे सोन्याचा मुलामा असलेले घड्याळ ते वापरतात.  (Nashik Political News)

महाराजांकडे एकूण एक कोटी २५ लाखांची जंगम मालमत्ता आहे. तर वीस लाख ८४ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. यातील वीस लाख ८४ हजारांची मालमत्ता त्यांनी स्वत: खरेदी केल्याचे महाराजांची म्हटले आहे. नाशिकमधील दुसरे उमेदवार जितेंद्र भाभे यांचा निर्भय महाराष्ट्र पक्ष असला तरी नोंदणीकृत पक्ष नसल्यामुळे त्यांचा अर्ज अपक्ष गृहित धरला जात आहे. भाभे यांच्याकडे २५ हजार रुपये रोख, पंधरा हजारांच्या ठेवी, साडेतीन तोळे सोने व दहा लाखांची गाडी असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली आहे.

३५ लाखांचे घर त्यांच्या नावावर असले तरी ४० लाखांचे कर्जही डोक्यावर आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता दहा लाख ७० हजारांची तर स्थावर मालमत्ता १५ लाखांची आहे. कमलाकर गायकवाड यांच्याकडे सव्वाचार लाखांची जंगम मालमत्ता तर २२ लाख ६९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. तीन लाख दहा हजारांचे कर्जही त्यांनी घेतल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

आता महायुतीच्या अर्जांकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीत अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. गुरुवार (ता.२) व शुक्रवार (ता.३) या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करावे लागतील. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनाविषयी नाशिककरांना कमालीची उत्सुकता लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT