Silt mixed water  esakal
नाशिक

Nashik News : नांदूर-मानूर परिसरातील गाळ मिश्रित पाणी; शुद्ध पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी

Nashik News : पावसाळ्याच्या आगमन होताच नांदूर-मानूर परिसरातील काही भागात बुधवारी (ता.१२) गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाळ्याच्या आगमन होताच नांदूर-मानूर परिसरातील काही भागात बुधवारी (ता.१२) गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. यामुळे महापालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली. बुधवारी नांदूर, मानूर परिसरात सकाळी नळांना पाणी येण्याच्या वेळेत पिण्यासाठी पाणी भरताना खूपच गढूळ पाणी येऊ लागल्याने अनेकांनी यासंबंधी आजूबाजूला चौकशी केली असता सर्व परिसरात गढूळ आणि गाळमिश्रित पाणी येत असल्याचे समजले.

यानंतर तत्काळ परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला परिसरात पाणी गढूळ येत असल्याची तक्रार केली. मात्र तोपर्यंत नागरिकांनी गढूळ पाणी न भरणे पसंत केले. नांदूर मानुर या परिसरात सकाळी सातला आणि सायंकाळी सातला अशा दोन वेळेस पाणी पुरवठा होत असतो. पावसाळ्यातही या परिसरात यापूर्वी अशा गढूळ पाणी पुरवठा झालेले नाही.

हे गढूळ पाणी नेमके कशामुळे आले, हे समजू शकले नाही. बुधवारी नेहमीप्रमाणे या परिसरातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची वेळ होताच, नळ सुरू केले तेव्हा त्यातून अत्यंत गढूळ पाणी येत असल्याचे दिसून आले. (latest marathi news)

त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने ते भरण्याचे काम थांबविण्यात आले. तब्बल एक तासाने परिसरातील नळांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरु झाला. ऐन पावसाच्या सुरवातीलाच अशा प्रकारे गढूळ पाणी आल्याने अशा दूषित पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येते की काय असा प्रश्‍न परिसरातील रहिवाशांना पडू लागली आहे.

दूषित पाण्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत असल्याने शुद्ध पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे. बुधवारी नळांना गढूळ पाणी आल्याने ते भरण्याचे टाळण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT