नाशिक

मुद्रांक अधिभारातून २१.२५ कोटींचे अनुदान

CD
टूडे साठी ----------- सिंहस्थाच्या खर्चात अडकलेल्या मनपाला दिलासा मुद्रांक अधिभारातून २१.२५ कोटींचे अनुदान मंजूर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मोठ्या विकासकामांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या महापालिकेला राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. नगरविकास विभागाने २०२६-२७ साठी मुद्रांक शुल्कावरील एक टक्का अधिभारातून राज्यातील २८ महापालिकांना एकूण ४२१ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यात नाशिकच्या वाट्याला २१ कोटी २५ लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४९-अ नुसार शहरातील मालमत्तेच्या विक्री, देणगी आणि भोगवटा गहाण व्यवहारांवर मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार आकारला जातो. यातून जमा होणारी रक्कम संबंधित महापालिकांना अनुदान म्हणून दिली जाते. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीतूनच हा निधी वितरित करण्यात येणार आहे. शहरात सध्या रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे तिजोरीवर पडलेला ताण काही प्रमाणात या अनुदानामुळे हलका होणार आहे. मात्र हा निधी नेमका कोणत्या कामांवर खर्च होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ----------------- महापालिकानिहाय अनुदान असे (रुपये) - नाशिक- २१ कोटी २५ लाख ६७ हजार २७६ - पुणे- १०९ कोटी ५४ लाख ६४ हजार ५७० - ठाणे- ९६ कोटी २६ लाख ८० हजार ७८२ - पिंपरी-चिंचवड- ४७ कोटी ७३ लाख - वसई-विरार- १७ कोटी ४७ लाख - नवी मुंबई- १७ कोटी ४७ लाख - मीरा-भाईंदर- १६ कोटी १३ लाख -------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exams Uncertainty News : एमपीएससीच्या अनिश्चित कारभाराने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात!

Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराची सुट्टी असतानाही बाजार का उघडतो? काय आहे मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा?

IND vs NZ 2nd ODI Live : आयना का बायना, जिंकल्याशिवाय जाईना... भारताचा नाट्यमय विजय, पावसाने वाचवले; मालिकेत आघाडी, कोण ठरला मॅच विनर?

भगवंत मान यांना व्हिसा देण्यास पाकिस्तान तयार; पण भारत सरकार परवानगी देणार का?

Latest Marathi News Live Update: पुण्यात कात्रज कोंढवा काकडे वस्तीमध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर, फुटपाथवर अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT