नाशिक

गोदाघाटाला आले पोलिस छावणीचे स्वरुप

CD
पान एक ॲंकर --------------------- 34066 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळानिमित्त पंचवटीतील रस्त्यांना करण्यात आलेले बॅरिकेडिंग. ध्वजारोहणानिमित्त गोदाघाटाला पोलिस छावणीचे स्वरूप राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीजसह राज्याचे गुप्तचर, सुरक्षा विभागांकडून पाहणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३० : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गोदाघाट परिसर, पंचवटी, जुने नाशिकसह आसपासचा सुमारे दीड ते दोन किलोमीटरचा परिसर पोलिस छावणीत रूपांतरित झाला होता. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीजसह राज्याचे गुप्तचर व सुरक्षा विभागांचे अपर पोलिस महासंचालकांसह पोलिस आयुक्त, अधिकाऱ्यांनी सातत्याने गोदाघाटाची पाहणी करून सुरक्षेच्या नियोजनाचा आढावा घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३१) दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण आणि सायंकाळी सातला गोदाआरती केली जाणार आहे. त्याअनुषंगाने गोदाघाट परिसराला आठवडाभरापासून कडेकोट सुरक्षात्मक नियोजन करण्यात आले आहे. तर, ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला गोदाघाट परिसराला अक्षरश: पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. गोदाघाटाकडे येणारे जवळपास सारे रस्ते बॅरिकेडिंग करून बंद केले आहेत. रामतीर्थाकडे फक्त अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. तर देवमामलेदार पटांगण, रोकडोबा पटांगण, भाजीपाला घाटावर सर्वसामान्य नागरिकांना पायी येता येणार आहे. परंतु, या सर्व मार्गांवर पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्तात नागरिकांची कसून तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळपासूनच नाकेबंदी करण्यात आली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड, एमजी रोड, रविवार कारंजा या परिसरातील दुकाने सायंकाळपर्यंत सुरू होती. परंतु बंदोबस्त असल्याने बाजारपेठेत येणे टाळले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी गोदाघाटाकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गांवरील खाद्यपदार्थांची दुकाने, हातगाडे हटविले आहेत. .... सुरक्षा पथक ठाण मांडून राष्ट्रपती यांच्या दौऱ्यामुळे शहरात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, आयबी, एनएसजीची विशेष पथके दोन दिवसांपासून ठाण मांडून आहेत. राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा, राज्य गुप्तचर विभागाचे पथकांसह एटीएसचे अधिकारी, पथकांकडून शहरातील हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. एनएसजी आणि फोर्सवनच्या पथकांनी गोदाघाटावरील रामतीर्थ परिसराचा ताबा घेतला आहे. तर, गोदाघाटालगतचा पंचवटी, जुने नाशिक परिसरातील दीड ते दोन किलोमीटरचा परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्तासह करडी नजर ठेवली जात आहे. गोदाघाटावर सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. .... लॉजेस्‌, हॉटेल्स, स्थानकांची तपासणी पंचवटी, जुने नाशिक परिसरासह बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेल्स, लॉजेसमध्ये थांबलेल्या पर्यटक, नागरिकांची सुरक्षा एजन्सीजसह स्थानिक पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरावरही करडी नजर ठेवली जात आहे. .... असा आहे बंदोबस्त पोलिस आयुक्त : १ उपायुक्त : ११ सहायक आयुक्त : १४ पोलिस निरीक्षक : ८५ सहायक/उपनिरीक्षक : २८७ पोलिस अंमलदार : ३४०० महिला अंमलदार : ६०० होमगार्ड : ५०० महिला होमगार्ड : १०० क्युआरटी : ४ तुकड्या राज्य राखीव दल : ४ तुकड्या बीडीडीएस पथक एकूण : ४९९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : पुण्यात मंगळवार पेठेत पेट्रोलने भरलेला टँकर कठडा तोडून रस्त्याच्या पलीकडे; मोठी दुर्घटना टळली!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT