Sinnar Flood Sakal
नाशिक

सिन्नरमध्ये पुराचा कहर! उभी पिके, घरे पाण्यात; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

दत्ता लवांडे

नाशिक : नाशिकमध्ये तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणातून ५,८८४ क्युसेकने पाणी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातही ढगफुटीसदृश्य पावसामुळे आलेल्या पुराने कहर केला असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय. जोमात आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे तोंडचा घास काढून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत.

(Sinnar Flood Latest Updates)

सिन्नर तालुक्यात रौद्ररूपी पावसानंतर आलेल्या पुरामुळे कित्येक घरे पाण्याखाली गेली असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे हंगामातच शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेलाय. यामध्ये काही हेक्टर जमीन पिकांसहित वाहून गेली आहे तर काही ठिकाणी उभ्या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे पिके सडू लागलेत. त्यामुळे सिन्नरमध्ये शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे.

दोन दिवसापासून पूराचा जोर वाढल्यामुळे शेती वाहून गेली असून शेतमाल पूर्णपणे खराब झाला. आता यातून काहीच उत्पन्न मिळणार नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं. तर काही नागरिकांच्या राहत्या घरात पाणी गेल्यामुळे झालेले नुकसान पाहून नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलंय. काही घरांचे पूर्ण नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून दखल घेण्यात येत असून पंचनाम्याला सुरूवात झाली आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे पण प्रत्यक्षात नुकसान झालेल्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

काल सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला असून या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे सिन्नरमध्ये काही लोकं अडकून पडले होते. त्यांना प्रशासनाकडून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी मागच्या तीन दिवसांत पावसाने हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT