smart city 1.jpg 
नाशिक

आनंदवार्ता! नाशिक स्मार्टसिटी कंपनी राज्यात प्रथम; केंद्राच्या नगरविकास मंत्रालयाकडून मूल्यांकन

विक्रांत मते

नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेडतर्फे शहरात पूर्ण झालेले प्रकल्प, सध्या सुरू असलेले प्रकल्प, निविदाप्रक्रियेत असलेले प्रकल्प व प्रकल्पांसाठी खर्च झालेला निधी, या बाबींचा विचार करून केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने राज्यात पहिल्या क्रमांकाचे मूल्यांकन दिले आहे. हेच मूल्यांकन देशभरातील स्मार्टसिटीमध्ये पंधराव्या क्रमांकावर आले आहे. गेल्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक राज्यात दुसरे, तर देशात अकराव्या क्रमांकावर आल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात शहर विकासाच्या दृष्टीने दुसरी समाधानकारक बाब समोर आली आहे.

नाशिक स्मार्टसिटी कंपनी राज्यात प्रथम

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयातर्फे दर महिन्याला स्मार्टसिटीच्या कामकाजाबाबत रॅंकिंग जाहीर केले जाते. यासंदर्भात स्मार्टसिटी मिशनच्या पोर्टलवर माहिती जाहीर केली जाते. त्यात नाशिक स्मार्टसिटी कंपनीने ३९ क्रमांकावरून १५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. काही महिन्यांचा आढावा घेतला असता, पुणे व नागपूर शहरांनाही मागे टाकले आहे. स्मार्टसिटीअंतर्गत शहरात ५२ प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यातील २२ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये स्मार्टसिटी निधी, सार्वजनिक खासगी भागीदारी, सीएसआर प्रकल्पांचा समावेश आहे. स्मार्टसिटीसाठी ५४० कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यात सध्या नऊ प्रकल्प सुरू आहेत. चार प्रकल्प निविदाप्रक्रियेत, तर उर्वरित प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे.

प्रगतिपथावरील प्रकल्प
सध्या गोदा सौंदर्यीकरण प्रकल्प सुरू आहे. मखमलाबाद शिवारातील नगररचना योजनेच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. गावठाण क्षेत्र विकास योजनेंतर्गत १७६ रस्त्यांची कामे करण्याचे नियोजित आहे. कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर पूर्ण झाले असून, पोलिस विभागाचे कमांड कंट्रोल सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक हजार किलो वॉटपैकी ३५८ किलोवॉट क्षमता असलेले सोलर पॅनल कार्यान्वित झाली आहेत. नाशिक अमरधाममध्ये वीज शवदाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे.

देशात पंधरावा क्रमांक, केंद्राच्या नगरविकास मंत्रालयाकडून मूल्यांकन

स्वच्छ भारत योजनेत अकरावा क्रमांक मिळाल्यानंतर स्मार्ट शहरांच्या यादीतही नाशिकने राज्यात पहिला, तर देशात पंधरावा क्रमांक पटकाविला आहे. स्मार्टसिटी अभियानांतील सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेले जातील.
राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

देशातील पहिली १५ शहरे
अहमदाबाद, सुरत, इंदूर, आग्रा, कानपूर, भोपाल, विशाखापट्टणम, द्रावणगिरी, वाराणसी, तुमकूर, वडोदरा, अमरावती (आंध्र प्रदेश), काकीनाडा, कोची, नाशिक.

महाराष्ट्रातील पहिली आठ शहरे
नाशिक (१५), पुणे (२८), नागपूर (४२), सोलापूर (४३), ठाणे (५५), पिंपरी-चिंचवड (६१), कल्याण- डोंबिवली (६२), औरंगाबाद (६६).

संपादन : रमेश चौधरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT