NSK26H34461
नाशिक ः सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील. शेजारी अभिजित नाईक, देविदास नांदगावकर, दत्ता आव्हाड, विलास बोडके व गोपाल साळुंखे आदी.
----------------
३६-४
वंचित घटकापर्यंत योजनांचा लाभ पोचविणार
जिल्हाधिकारी : सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.४ : सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजनिर्मितीला बळ देतानाच वंचित व दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविताना व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी चित्ररथाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्याभरात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी जनजागृती होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.४) सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखविला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ व अभिजित नाईक, समाजकल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी गोपाल साळुंखे उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावांत पोहोचणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत (विशेष घटक योजना) जिल्हा माहिती कार्यालयातर्फे हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात योजनांचे स्वरूप, लाभ मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती सोप्या व प्रभावी पद्धतीने चित्ररथात मांडण्यात आली आहे. चित्ररथाच्या माध्यमातून थेट गावपातळीवर जनजागृती केली जाईल.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.