Solar panel mounted on bike by Javed Sheikh esakal
नाशिक

Nashik News : नाशिकच्या रस्त्यावर धावतेय ‘सोलर बाईक’; एका अवलियाचा यशस्वी प्रयोग

Nashik : पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती तर दुसरीकडे विजेचा वाढता दरामुळे इंधनावर चालणारे वाहन असो वा इलेक्ट्रिकल वाहन वापरणे सर्व सामान्यांना परवडणारे नाही.

केशव मते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती तर दुसरीकडे विजेचा वाढता दरामुळे इंधनावर चालणारे वाहन असो वा इलेक्ट्रिकल वाहन वापरणे सर्व सामान्यांना परवडणारे नाही. पण नाशिकमधील एका अवलियाने चक्क सोलर पॅनेलवर मोपेड वाहन चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. एका शंभर वॅटच्या पॅनेलवर मोपेड तब्बल ८० किमी धावते, असा त्याने दावा केला आहे. ()

असे असले तरी सोलर पॅनेलवर धावणारे हे मोपेड वाहन नाशिकच्या रस्त्यावर धावताना अनेकांचे लक्ष वेधून घेते आहे. मूळचे नाशिककर असलेले जावेद शेख हे बडोदा येथील स्नायडर कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले जावेद यांना पाच वर्षांपूर्वी सोलर पॅनेलवर बाईक चालविण्याची कल्पना सुचली.

याच कल्पनेच्या आधारे ते पाच वर्षांपासून मोपेड बाईकवर प्रयोग करीत होते. अखेर सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या सोलर दुचाकीच्या कल्पनेला प्रत्यक्षात मूर्तस्वरूप आले. आजघडीला मोपेडच्या चारीही बाजूने अँगल लावले आणि त्यावर १०० वॅटचे सोलर पॅनेल बसविले. (latest marathi news)

अशी आहे सोलर बाईक

जावेद यांनी त्यांच्या मोपेडला १०० वॅटचे सोलर पॅनेल जोडले आहे. सोलरच्या माध्यमातून बाईकची बॅटरी चार्ज होते. यामुळे ही बाईक तब्बल ८० ते ११० किलोमीटर अंतर धावू शकते, असा त्यांचा दावा आहे. यासाठी जावेद यांनी सिंक्रोनायझेशन सर्किटचा वापर केला असून, हे सर्किट सोलर आणि इलेक्ट्रिक या दोन्ही पर्यायांनुसार बॅटरी चार्ज करते.

उन्हामध्ये मोपेड उभी असेल तरीही सोलरमुळे बॅटरी चार्ज होण्याची प्रक्रिया सुरूच असते. सोलर पॅनेल, सर्किट, मॅकनिकल ॲडजेस्टमेंट व डॅमप्रु ब्रॅकेट असे महत्त्वाचे साहित्य वापरण्यात आले आहे. यासाठी जावेद यांना अवघा २५ हजारांचा खर्च आला आहे.

''इंधन आणि इलेक्ट्रिकच्या तुलनेमध्ये सोलर पॅनेल संकल्पनेनुसार बनविलेली ही बाईक किफायतशीर असल्याचे वाटते. सध्या प्रायोगिक स्वरूपात वापरताना येणाऱ्या समस्यांनुसार त्यात बदल करतो आहे.''- जावेद शेख, पखाल रोड, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

Marathi News Live Updates : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची कारवाई; डीजेचे साहित्य जप्त

कच्चं तेल १०८ डॉलरवर, सोमवारी ३.३ टक्क्यांची वाढ; कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Ganeshotsav : वैद्यकीय साहित्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; आरोग्यसेवा व पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT