NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik NMC News : स्ट्राँगरूमच्या स्वच्छतेसाठी 44 कर्मचाऱ्यांचे विशेष पथक

Nashik News : लोकसभेच्या दिंडोरी व नाशिक लोकसभेचे मतदान संपल्यावर ईव्हीएम यंत्रे अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमधील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभेच्या दिंडोरी व नाशिक लोकसभेचे मतदान संपल्यावर ईव्हीएम यंत्रे अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमधील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. या स्ट्राँगरूमच्या स्वच्छतेसाठी महापालिकेतर्फे ४४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा संकलनासाठी दोन स्वतंत्र घंटागाड्या व २० तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली. (special team of 44 personnel to clean strongroom)

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे सोमवारी (ता. २०) मतदान झाले. मतदान झाल्यावर सर्व ईव्हीएम यंत्रे अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये ठेवण्यात आली. मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर ईव्हीएम मशिन परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक, दोन स्वच्छता निरीक्षक, दोन मुकादम व ३९ सफाई कर्मचारी येथे नियुक्त करण्यात आले. कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून विशेष ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. (latest marathi news)

स्ट्राँगरूममध्ये कार्यरत असलेले कर्मचारी तसेच पोलिसांसाठी शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, शहरातील मतदान केंद्रांची महापालिकेतर्फे स्वच्छता करण्यात आली. पूर्व विभागातील ३७ मतदान केंद्रांसाठी १११ सफाई कर्मचारी, पश्चिम विभागातील २९ मतदान केंद्रांसाठी ८७.

सातपूर विभागातील १८ मतदान केंद्रांसाठी ३६, सिडको विभागातील ४३ मतदान केंद्रांसाठी ८६, नाशिक रोड विभागातील २२ मतदान केंद्रांसाठी ४६, तर पंचवटी विभागातील ३२ मतदान केंद्रांसाठी १२० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT