Nashik Accident News  esakal
नाशिक

Nashik Accident News : नांदिन, तांदळवाडी रस्त्यावरून भरधाव बसची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Accident News : जायखेडा पोलिस ठाण्यात राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील नांदिन येथील नांदिन, तांदुळवाडी रस्त्यावर राज्य परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर त्यांचा मित्र किरकोळ स्वरूपात दुखापत झाल्याची घटना घडली. जायखेडा पोलिस ठाण्यात राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik speeding bus collided with bike on Nandin Tandalwadi road)

ताहाराबाद येथील मोसम नदीवरील धोकादायक पुलावरून अवजड वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आल्यानंतर बहुतेक वाहने मिळेल त्या रस्त्यावरून धावतांना दिसत आहेत. दरम्यान संबधित वाहनचालक ग्रामीण भागातील रस्त्यावरील वळण रस्ते तसेच रस्त्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात ओव्हरटेक करीत धावत आहेत.

अंतापुर व ताहाराबाद गावातूनच होत असलेली वाहतूक ग्रामस्थांकडून बंद करताच तांदळवाडीहुन तर काही वाहने नामपूर मार्गावरून मार्गस्थ होतांना दिसत आहेत. नांदिन,  तांदळवाडी रस्त्यावरून बस क्रमांक (एमएम १४, बीटी १८३०) ही नवापूर, पुणे भरधाव वेगात रस्त्यावर धावत असतानाच समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएम ४१, बीएन १३८९) ला राॅग साईडने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली यात दुचाकीस्वार सुधाकर गुलाबराव शिंदे हे गंभीर जखमी झाले तर त्यांचा मित्र सुधीर बुवाजी भामरे हे किरकोळ जखमी झाले आहेत. (latest marathi news)

जखमी सुधाकर शिंदे यांना तातडीने सटाणा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुधाकर शिंदे यांच्या फिर्यादीवरून दुचाकीच्या नुकसानीस व अपघाताला कारणीभूत ठरलेला बसचालक योगेश आत्माराम राठोड (रा.सेवानगर, पो.उपखेड ता.चाळीसगाव) याच्यावर जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविंद्र भामरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT