ST  File Photo
नाशिक

नाशिक : बसफेऱ्यांची संख्या पोचली हजारापर्यंत

एसटी कर्मचारी संपाची तीव्रता घटत चालली असून, कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एसटी कर्मचारी संपाची तीव्रता घटत चालली असून, कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. बुधवारी (ता. ९) नाशिक विभागातून आणखी २९ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. अशात गुरुवारी (ता. १०) परिवहनमंत्री अनिल परब यांच्‍या घोषणेकडे एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचे लक्ष लागून आहे. दरम्‍यान, विभागातून धावणाऱ्या बसगाड्यांच्‍या फेऱ्यांची संख्या एक हजारापर्यंत पोचली आहे.

मंत्री परब यांनी अल्टिमेटम दिल्‍यानंतर गेल्‍या काही दिवसांत ५८ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. त्‍यात बुधवारी आणखी २९ कर्मचाऱ्यांची भर पडली. सध्या कामावर हजर होण्यासाठी मुदत दिल्‍यामुळे बडतर्फीची कारवाई सध्या बंद आहे. दुसरीकडे एसटी प्रशासन बसगाड्यांची व बस फेऱ्यांची संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. बुधवारी सायंकाळी सहापर्यंत नाशिक विभागातून २७० बसगाड्यांच्‍या ९४२ बस फेऱ्या झाल्‍या होत्‍या. रात्री बारापर्यंत ही संख्या एक हजारपर्यंत जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. यात नाशिक एक विभागातून ३९ खासगी शिवशाहीसह एकूण सत्तर बसगाड्या सुटल्‍या. पंचवटी आगारातून १७, मालेगाव १९, सिन्नर आगारातून ३५, सटाणा २० बसगाड्या धावल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chadchan Crime Six Killed Land Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जमिनीच्या वादातून हत्याकांड, सहा जणांची धारधार शस्त्रांनी हल्ल्यानंतर गोळ्या घालून निर्घृण हत्या

Latest Marathi Update Live: विदर्भातील पाचही विधान परिषद जागांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

Travels Bike Accident : खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीस धडक; चार तरुणांचा जागीच मृत्यू

Sai Sudharsan Hit Wicket: साई सुदर्शनची बॅट पुन्हा स्टम्पवर पडली, शुभमनने डोक्यावर हात मारला; विचित्र विकेटचा Video Viral

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३० मे २०२६ ते ५ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT